शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

जातीयवादी सरकारला पायउतार करण्याकरिता आघाडीचा धर्म पाळा : हर्षवर्धन पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 16:31 IST

मेळाव्यात मावळ तालुक्यासह विविध भागातील काँग्रेस पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बाबतची नाराजी बोलून दाखवली.

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीतील वाद संपुष्टात 

लोणावळा : जातीयवादी भाजपा व शिवसेना सरकारला पायउतार करण्याकरिता प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळवा असे आवाहन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपस्थितीमध्ये लोणावळ्यात काँग्रेसचा मेळावा आज संपन्न झाला.  लोणावळ्यात काँग्रेस मेळाव्यात माजी खासदार अशोक आण्णा मोहोळ, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार दिलीप ढमढेरे, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप, प्रांतिक सदस्य दत्तात्रय गवळी, रामभाऊ बराटे, सोमनाथ दौंडकर, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, विलास बडेकर, यादवेंद्र खळदे, निखिल कविश्वर, प्रमोद गायकवाड, भानुदास खळदे, गणेश काजळे, पुष्पा भोकसे, हाजीमलंग मारिमत्तु यांच्यासह अनेक पदाधिकारी, नगरसेवक नगरसेविका व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.  याप्रसंगी मावळ तालुक्यासह विविध भागातील काँग्रेस पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बाबतची नाराजी बोलून दाखवली. यावर बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, केवळ मतांचे विभाजन झाले म्हणून २०१४  च्या निवडणुकीत देशात केवळ 39 टक्के मते मिळालेला जातीयवादी भाजपा पक्ष सत्तेत बसला व मत विभाजन झाल्याने ६१ टक्के मते मिळालेले इतर सर्व पक्ष विरोधात बसले. यावेळी मात्र मतांचे विभाजन टाळण्याकरिता देशातील समविचारी २१ पक्ष काँग्रेसच्या सोबत आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखिल आहे. जातीयवादी सरकारला सत्तेतून पाय उतार करण्यासोबत दिल्लीत राहुल गांधी यांचे हात बळकट करण्याकरिता लोकसभेची प्रत्येक जागा महत्वाची आहे. याकरिता सर्व मतभेद बाजुला ठेवून प्रत्येक कार्यकत्यार्चे आघाडीचा धर्म पाळायचा आहे. जी खंत कार्यकर्त्यांची आहे  तीच आमची देखील आहे मात्र, ही वेळ आपापसात वाद घालण्याची नसून जातीयवादी पक्षांना रोखण्याची व मतांचे विभाजन टाळण्याची असल्याने काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आघाडीच्या प्रचारयंत्रणेत सहभागी व्हावे असा पक्षादेश आला आहे, त्याचे काटेकोर पालन करावे असे पाटील यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष संजय जगताप, मोहोळ, बराटे यांनी देखिल आघाडीचे काम करण्याच्या सुचना मेळाव्यात केल्याने पुणे जिल्ह्यातील आघाडीतील वाद संपुष्टात आला आहे.

 विधानसभा जागांबाबत वरिष्ठ निर्णय घेतील जसा राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभा जागांमध्ये इंटरेस्ट आहे  तसा आमचा विधानसभांच्या जागेत आहे. पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या 21 जागा आहेत यापैकी ज्याठिकाणी काँग्रेसची ताकद आहे त्या जागा काँग्रेसला मिळाव्यात अशी मागणी केली असून याबाबत राहुल गांधी व शरद पवार जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल अशी चर्चा राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत झाली असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :lonavalaलोणावळाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक