मूलभूत समस्या सोडविण्यावर भर
By Admin | Updated: September 16, 2014 00:19 IST2014-09-16T00:19:36+5:302014-09-16T00:19:36+5:30
वेगाने वाढत्या नागरीकरणामुळे शहरातील कचरा, वाहतूक आणि पाण्याची समस्या गंभीर बनल्या आहेत.

मूलभूत समस्या सोडविण्यावर भर
पुणो : वेगाने वाढत्या नागरीकरणामुळे शहरातील कचरा, वाहतूक आणि पाण्याची समस्या गंभीर बनल्या आहेत. या समस्या सर्वपक्षीय नगरसेवक आणि पुणोकरांच्या सहभागातून सोडविण्यावर आपला भर राहणार असल्याचे आश्वासन नवनिर्वाचित महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी आज मुख्यसभेत सर्वपक्षीय नगरसेवकांना दिले. धनकवडे यांना शहराची रचना, वाहतूकसमस्या आणि पालिका प्रशासनाची चांगली जाण असल्याने त्यांनी या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुख्यसभेत व्यक्त केली.
महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागुल मावळत्या महापौर चंचला कोद्रे, मावळते उपमहापौर बंडू गायकवाड यांना आज मुख्यसभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपली मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. या वेळी विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, सेनेचे गटनेते अशोक हरणावळ, मनसेचे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक अविनाश बागवे, भाजपाचे गटनेते गणोश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी, नगरसेवक बाबू वागसकर, योगेश टिळेकर, नगरसेविका नंदा लोणकर, वैशाली बनकर सुनंदाताई गडाळे, मीनल सरवदे, अश्विनी जाधव, नगरसेवक प्रशांत जगताप, सचिन भगत, रवींद्र धंगेकर, बाबूराव चांदेरे, रवींद्र माळवदकर यांनी मनोगते व्यक्त केली.
शहराच्या वाहतूकसमस्येसह कचरा, पाणी, तसेच मेट्रोसह इतर समस्या मोठय़ा प्रमाणात वाढल्या असून, महापौर आणि उपमहापौरांनी एकत्रितरीत्या नवीन उपक्रम राबवून ते सोडविण्याची मागणी केली. त्यास सकारात्मक प्रतिसाद शहराच्या विकासात सर्वाच्या भावनांचा आदर करून, तसेच समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक पुणोकरासह सर्वपक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन या समस्या सोडविण्याचे आश्वासन धनकवडे यांनी या वेळी दिले. शहरामध्ये नावीन्यपूर्ण योजना राबविण्याकडेही कल असणार असल्याचे महापौर म्हणाले. (प्रतिनिधी)
कचरा, पाणी, तसेच वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी आमचे प्रथम प्राधान्य राहील. पुणोकरांची, तसेच सर्वपक्षीय नगरसेवकांचे सहकार्य घेतले जाईल. तसेच, 23 गावांच्या विकास आराखडय़ासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
- दत्तात्रय धनकवडे, महापौर
शहराच्या सुनियोजित विकासासाठी पुणो फस्र्ट हे ब्रीदवाक्य घेऊन पुढील काम करणार आहोत. प्रशासन, नगरसेवक, तसेच शहरातील तज्ज्ञांची विशेष समिती नेमून याबाबत ठोस कृती कार्यक्रम राबविण्यास आपले प्राधान्य राहील.
- आबा बागुल, उपमहापौर
शहरासाठी काम करताना, महापौर म्हणून जेवढा वेळ मिळाला त्यामध्ये जबाबदा:या पार पाडल्याचा विशेष आनंद आहे. आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागले. आता नगरसेविका म्हणूनही जबाबदारी निभावताना, शहर विकास, तसेच प्रभागाच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करणार आहोत.
- चंचला कोद्रे, माजी महापौर
शहराच्या असलेल्या समस्या आणि त्यासाठी काम करण्यास मिळालेला वेळ कमी असल्याने बरेच काही करण्याचे राहून गेल्याची खंत आहे.
- बंडू गायकवाड, माजी उपमहापौर