मंगळवारी चक्का जाम आंदोलन

By Admin | Updated: January 28, 2017 00:20 IST2017-01-28T00:20:54+5:302017-01-28T00:20:54+5:30

मराठा समाजाच्या वतीने ३१ जानेवारीला सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत राज्यभर चक्का जाम आंदोलन होणार आहे. विविध मागण्यासाठी राज्यभर मराठा क्रांती

The flywheel movement on Tuesday | मंगळवारी चक्का जाम आंदोलन

मंगळवारी चक्का जाम आंदोलन

पिंपरी : मराठा समाजाच्या वतीने ३१ जानेवारीला सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत राज्यभर चक्का जाम आंदोलन होणार आहे. विविध मागण्यासाठी राज्यभर मराठा क्रांती (मूक) मोर्चा काढण्यात आला होता; परंतु राज्य शासनाने त्या मागण्यांची दखल घेतली नाही. यासाठी चक्का जाम आंदोलन घेण्यात येणार आहे. यासाठी मराठा समाजाच्या वतीने भोसरीत बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.
पिंपरी- चिंचवड शहरात पांजरपोळ छत्रपती शिवाजी चौक (भोसरी), मॅगझिन चौक (दिघी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पिंपरी), नाशिक फाटा, इंदिरा कॉलेज, पुणे- मुंबई हायवे (वाकड), भुजबळ चौक (हिंजवडी चौक), भक्ती-शक्ती चौक या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे, अशी माहिती आबा पाटील यांनी दिली. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार आहे. आंदोलनाच्या वेळी रुग्णवाहिकासाठी मार्ग मोकळा करून देण्याच्या सूचना स्वयंसेवकांना दिल्या आहेत. राज्यसरकारने मराठा समाजाच्या मागणीची योग्य प्रकारे दखल घ्यावी यासाठी चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मराठा समाजाच्या मागण्या शासनाला मान्य कराव्या लागतील, असे आबा पाटील यांनी सांगितले.(प्रतिनिधी)

Web Title: The flywheel movement on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.