शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
5
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
6
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
7
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
8
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
9
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
10
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
11
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
12
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
13
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
14
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
15
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
16
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
17
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
18
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
19
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
20
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र

चांदणी चौक येथील उड्डाणपूल काम सुरु होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 16:36 IST

चांदणी चौक येथील उड्डाणपुलाचे रखडलेले भूसंपादन आता ९० टक्के पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारचे भूसंपादनासाठी महापालिकेला १८५ कोटी रूपयेठेकेदार कंपनी निश्चित करून कामाचा आदेश देणे बाकी उड्डाणपुलामुळे चांदणी चौकात सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार

पुणे: चांदणी चौक येथील उड्डाणपुलाचे रखडलेले भूसंपादन आता ९० टक्के पुर्ण झाले असून येत्या दोनच आठवडयात प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी (दि. ५ ) सकाळी महापालिकेत घेतलेल्या बैठकीत ही माहिती अधिकाºयांकडून देण्यात आली. वारसा हक्काची एक दोन प्रकरणे न्यायालयात असून त्याचा निकाल लागेपर्यंत संबधितांचे नुकसानभरपाईचे पैसे न्यायालयात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री बापट यांच्यासह महापालिका आयुक्त सौरव राव, अतिरिक्त आयुक्त शितल उगले-तेली, महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, केंद्रीय रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, स्थानिक नगरसेवक दिलीप वेडेपाटील तसेच महापालिकेच्या भूसंपादन व अन्य विभागांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. महापालिकेकडून भूसंपाद होत नसल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. महामंडळाने या रस्त्याच्या कामासाठी ४२१ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र १०० टक्के भूसंपादन झाल्याशिवाय काम सुरू करणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळेच भूमिपूजन होऊनही भूसंपादनच होत नसल्याने हे काम रखडले आहे. बैठकीत महापालिकेच्या वतीने ९० टक्के भूसंपादन झाले असल्याचे सांगण्यात आले. राज्य सरकारने भूसंपादनासाठी महापालिकेला १८५ कोटी रूपये दिले आहेत. त्याची मागणी करणार असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली. जी थोडी जागा राहिली आहे त्यात वारसा हक्काचा प्रश्न असून तो न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या जागांबाबत जी काही नुकसान भरपाई असेल ती न्यायालयात जमा करावी व कामाला सुरूवात करावी असे बापट यांनी सुचवले. रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तशी तयारी दर्शवली, मात्र शक्यतो संपूर्ण जागा ताब्यात घ्यावी असे त्यांनी सांगितले. एकदा काम सुरू झाले व नंतर न्यायालयाचा निर्णय किंवा अन्य काही अडचणी आल्या तर त्याचा कामावर परिणाम होतो असे ते म्हणाले. कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्याला प्रातिसाद मिळाला आहे. आता ठेकेदार कंपनी निश्चित करून कामाचा आदेश देणे बाकी आहे. त्यामुळे महामंडळाची तयारी पुर्ण झाली आहे. भूसंपादनाचा प्रश्नही आता बहु्अंशी निकालात निघाला आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन आठवड्यात कामाला सुरूवात होण्यास हरकत नसावी असे बापट म्हणाले. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना होकार दिला असल्याची माहिती मिळाली. या उड्डाणपुलामुळे चांदणी चौकात सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेkothrudकोथरूडPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाgirish bapatगिरीष बापटsaurabh raoसौरभ राव