शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

फुलांचे बाजारभाव कोसळले, पितृपंधरवड्यात नुकसान, पितृपंधरवड्यात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:48 IST

दसरा आणि दीपावलीच्या सणांमध्ये फूलबाजारात अधिराज्य गाजविणाऱ्या राजा शेवंतीबरोबरच इतरही फुलांचे भाव पितृपंधरवड्यामुळे कोसळल्याने फूलउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.

भुलेश्वर - दसरा आणि दीपावलीच्या सणांमध्ये फूलबाजारात अधिराज्य गाजविणाऱ्या राजा शेवंतीबरोबरच इतरही फुलांचे भाव पितृपंधरवड्यामुळे कोसळल्याने फूलउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.पुरंदर तालुक्यात दर वर्षीच झेंडू, राजा शेवंती, कापरी, बिजली, पेपर व्हाईट इत्यादी फुले दर वर्षीच फुलवली जातात. या फुलांचे उत्पादनही चांगले निघते. यामुळे शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळते. यामुळे अनेक शेतकरी फुलशेतीकडे वळाले आहेत. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात तर प्रमुख पीक म्हणून राजा शेवंतीचे पीक घेण्यात येते. या फुलांची लागवड ऐन उन्हाळ्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात केली जाते. या वेळी पुरंदर तालुक्यात सर्वाधिक तापमान असते. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवते.या फुलांचे बेणे अहमदनगर येथून आणावे लागते. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन माळशिरस, टेकवडी व पोंढे या गावांतून निघत आहे. पुरंदरच्या पश्चिम भागातच बिजली, कापरी व झेंडूचे उत्पादन घेतले जाते. दर वर्षीच दसरा व दीपावलीच्या तोंडावर फुलांना मागणी वाढते. सध्या राजा शेवंतीचे फड उमलू लागले असून, ही फुले मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येत आहेत. सध्या पितृपंधरवडा असल्याने फुलांना मागणी फार कमी आहे. मालाला उठाव नाही. यामुळे दोन वर्षांपूर्वी राजा शेवंतीची फुले दोनशे रुपये प्रतिकिलो विकली गेली होती. मात्र, गुरुवारी फक्त २० रुपये किलो दराने विकली गेली. यामुळे ऐन दसरा-दिवाळीत बाजारभाव काय असतील, हा प्रश्न फूलउत्पादकांना पडला आहे. दर वर्षीपेक्षा यंदा फूलउत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.सध्या बाजारपेठेत पेपर व्हाईटसारखी पांढºया रंगाची फुले सध्या चालू आहेत. ही फुले ग्राहकांना पसंत पडतात. याचा परिणाम राजा शेवंतीच्या फुलांवर होतो. त्याचप्रमाणे पितृपंधरवडा असल्याने मालाला उठाव नाही. संपूर्ण शेत पांढरेशुभ्र झाले आहे. अशात जर पाऊस पडला, तर फुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल.- सचिन बोरकर, फूलउत्पादक शेतकरीनुकताच गौरी-गणपती उत्सव पार पडला. सध्या पितृपंधरवडा असल्याने फुलांच्या मालाला मागणी कमी आहे. यामुळे सध्या २० रुपयांनी फुले विकावी लागतात. अहोरात्र कष्ट करणाºया शेतकºयांचे पैसे वसूल होत नाहीत.- मोहन कुंजीर, फुलांचे व्यापारीगणेशोत्सवानंतर फुलांचे भाव एकदमच खाली आले. सध्या पितृपंधरवडा सुरु असल्याने भाव आणखी खाली आले. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. आगामी नवरात्रोत्सवासह दिवाळीमध्ये फुलांना उठाव मिळण्याची आशा आहे. 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या