शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

पूरामुळे जिल्ह्यात कोट्यवधींचे नुकसान : नवल किशोर राम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 21:03 IST

शहरासह जिल्ह्यातील काही भागात कमी वेळेत जोरदार वृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली.

ठळक मुद्दे८३२ जनावरे मृत : हजारो वाहने गेली पाण्याखालीग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात मालमत्तेचे तुलनेने मोठे  नुकसान हवेलीतील खेड-शिवापूर, कात्रज, आंबेगाव येथे जोरदार पाऊस

पुणे : जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे शहर आणि जिल्ह्यामधे १४ जणांचा मृत्यू झाला असून, ९ जण बेपत्ता आहेत. लहान-मोठी ८३२ जनावरे मृत झाली आहेत. हवेली, पुरंदर आणि बारामती तालुक्याला पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. शहरातील हजारो वाहने पाण्याखाली अथवा वाहून गेली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. सहकारनगरमधील अरण्येश्वर परिसरातील दीड ते दोन हजार वाहने पाण्याखाली गेली होती. त्यामुळे नागरिकांच्या मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज आहे. शहरासह जिल्ह्यातील काही भागात कमी वेळेत जोरदार वृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात मालमत्तेचे तुलनेने मोठे  नुकसान झाले आहे. नाझरे धरणातून कऱ्हा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने बारामती तालुक्यातील २१ गावांना फटका बसला. येथील ३८ मदत शिबिरामधे अडीच हजार नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले. पुणे शहरातील ३ हजार नागरिकांना काही काळासाठी इतरत्र हलविण्यात आले होते. हवेलीतील खेड-शिवापूर, कात्रज, आंबेगाव येथे जोरदार पाऊस झाला. येथील सात गावांना पावसाचा फटका बसला. पुरंदरमधील २४ आणि भोर तालुक्यातील एक गाव पावसामुळे बाधित झाले आहेत. दरड कोसळल्यामुळे हवेली आणि पुरंदरमधील प्रत्येकी २ आणि भोरमधील १ रस्ता बंद झाला. सासवड-जेजुरी मार्ग देखील काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेने दिली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत या वेळी उपस्थित होते. ------------------अतिवृष्टीमुळे मृत जनावरे

तालुका        लहान         मोठी         वाहून गेलेली (बेपत्ता)हवेली           ३५०              ४                 -पुणे शहर      १४               १६               १४पुरंदर            ४२४             २४                -एकूण           ७८८             ४४               १४          

टॅग्स :PuneपुणेNavalkishor Ramनवलकिशोर रामfloodपूरRainपाऊस