शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहराला ओढ्यांची ‘मिठी’ : पुरंदर, बारामतीमध्ये कऱ्हा कोपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 11:27 IST

९०० च्यावर जनावरेही मृत्युमुखी पडली असून हजारो वाहनांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देपुरात २० बळी; ३ बेपत्ताबुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात आंबिल ओढ्याला प्रचंड पूर पुणे शहरासह जिल्ह्यातील ५ तालुक्यांना बुधवारी रात्री धुवाँधार पावसाचा फटका बसला. 

पुणे : पुणे शहरातील ओढे आणि पुरंदर, बारामतीमधून वाहणाऱ्या कऱ्हा नदीने रौद्र रुप धारण केल्याने उडालेल्या हाहाकारात १५ जणांचा बळी गेला. ८ जण वाहून गेल्याने बेपत्ता आहेत. ९००च्यावर जनावरेही मृत्युमुखी पडली असून हजारो वाहनांचे नुकसान झाले आहे. झोपडपट्ट्यांबरोबरच आलिशान सोसायट्या आणि बंगल्यांमध्येही पुराचे पाणी घुसल्याने नागरिक भयभित झाले होते. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. कात्रज तलाव साखळीतील तीनही तलावांच्या परिसरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे आंबिल ओढ्याला प्रचंड पूर आला. कात्रजपासून ते जनता वसाहतपर्यंतच्या संपूर्ण परिसरातील घरांना पुराच्या पाण्याने वेढले. सुमारे आठ ते दहा फूट पाणी वाहत होते. यामध्ये ओढ्यासह अनेक सोसायट्यांच्या संरक्षक भिंती कोसळल्याने शेकडो वाहने वाहून गेले. पुणे शहरासह जिल्ह्यातील ५ तालुक्यांना बुधवारी रात्री धुवाँधार पावसाचा फटका बसला. 

..............अरण्येश्वर येथील टांगा कॉलनीतील घराची भिंत पडून सहा जणांचा मृत्यू  झाला. यामध्ये जान्हवी  सदावर (वय ३२)  त्यांचा मुलगा  मुलगा श्रीतेज (वय ९), रोहित आमले (वय १५)  वस्तीतील लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे संतोष कदम (वय ५५) हे रिक्षाचालक यांचा समावेश आहे. याच वस्तीतील लक्ष्मीबाई पवार (वय ७०) आणि ज्योस्ना राणे (वय ३०) या दोघी पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहून गेल्या...........खेडशिवापूरमध्ये पावसाने चौघांचे प्राण गेले. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरती श्याम सूर्यवंशी (वय ३५),  शाम रामलाल सूर्यवंशी (वय ४०) आणि त्यांची मुलगी गौरी (वय १४) यांचा मृत्यू झाला. साईनाथ सोपान भालेराव (वय ३५)  यांचा मृत्यू झाला. फकीर राजू (वय ४०) आणि एका तृतीयपंथीयाचाही मृतदेह सापडला आहे. मुसळधार पावसामुळे  ससेवाडी, गोगलवाडी, शिंदेवाडी, वेळू, कासुर्डी या भागातील ओढ्याचे पाणी खेडशिवापुर जवळ एकत्र आले.  ........सिंहगड रस्त्यावरील ओढ्याला आलेल्या पुरात मोटार वाहून जाऊन किशोर दत्तात्रय गिरमे (वय ५४) यांचा मृत्यू झाला. मच्छिंद्र पांडुरंग बवले (वय ४२) यांचाही बुडून मृत्यू झाला. अमृता आनंद सुदामे (वय ३७) या परिचारिका दुचाकीवरून जात असताना वाहनू गेल्या. सनसिटीजवळील मैदानावर त्यांचा मृतदेह सापडला. ..........वानवडी परिसरात वाहणाºया भैरोबा नाल्याला आलेल्या पुरात मोटारीतून  जाणारे दोघे जण वाहून गेले.  व्हिक्टर सांगळे (वय २६) आणि सलीम शेख अशी त्यांची नावे आहेत. कात्रज परिसरात मोटार वाहून गेल्याने त्यातील तीन जण बेपत्ता झाले आहेत. या ठिकाणी एका महिला आणि मुलाला  वाचविण्याच्या प्रयत्नात नागराज बाळकृष्ण भिल (वय २२) या तरुणाचा मृत्यू झाला. सुमन अजिनाथ शिंदे (वय ६५) यांचाही मृत्यू झाला. ........पुरंदर तालुक्यात भिवडीतील ओढ्याला  आलेल्या पुरामुळे भिवडी येथे गजराबाई  सुदाम खोमणे (वय ७५) आणि छकुली अनंता खोमने (वय २१) या दोघी वाहून गेल्या. भिवडी येथील ओढ्यालागत खोमणे कुटुंबीय राहत होते.  अचानकपने पाण्याचा लोंढा आल्याने संपूर्ण घराला पाण्याने  वेढा घातला होता. ........ 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीfloodपूरRainपाऊसDeathमृत्यू