शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

एसआरए पालिका वादात पूरग्रस्त अधांतरीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 12:46 IST

२५ सप्टेंबरच्या अतिृष्टीमुळे आंबिल ओढ्याला आलेल्या पुरात या कुटुंबांचे घरदार उद्ध्वस्त झाल्याने, हे सर्व जण महापालिकेच्या धर्मवीर संभाजीराजे हायस्कूल शाळा क्रमांक १७ मध्ये राहत आहेत़.

ठळक मुद्देशाळा सुरू होण्यापूर्वी बाधितांच्या पुनर्वसनाचा दावा : महिनाभरापासून पूरग्रस्तांकडे दुर्लक्ष 

पुणे :  महापालिकेने यादी सादर केली, की पात्रता तपासणी करून शाळेत मुक्कामी असलेल्या पूरग्रस्त कुटुंबांना आम्ही घरे देऊ, अशी भूमिका एसआरए प्रशासनाने घेतली आहे़. तर, दांडेकर पूल येथील लाभार्थींची पात्रता यादी यापूर्वीच एसआरएला देण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे़. परंतु, या दोघांच्या दाव्या-प्रतिदाव्यामध्ये पूरग्रस्त कुटुंबांची गेले महिनाभर मोठी अवहेलना झाली आहे़. २५ सप्टेंबरच्या अतिृष्टीमुळे आंबिल ओढ्याला आलेल्या पुरात या कुटुंबांचे घरदार उद्ध्वस्त झाल्याने, हे सर्व जण महापालिकेच्या धर्मवीर संभाजीराजे हायस्कूल शाळा क्रमांक १७ मध्ये राहत आहेत़. पण, आता दिवाळीच्या सुट्यांनंतर शाळा सुरू झाल्यावर आपण जायचे कोठे, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे़. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत यांचे पुनर्वसन होणे जरुरी होते़. मात्र, गेली कित्येक वर्षे एसआरए व महापालिका प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवून, तांत्रिक अडचणींचा मुद्दा उपस्थित करीत असल्याचा आरोप पूरग्रस्त कुटुंबीयांनी केला़. दरम्यान, शाळेतील बाधित कुटुंबीयांची यादी पालिकेकडून एसआरए प्रशासनाला लागलीच सुर्पूत केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले़ .तर, ही यादी मिळाल्यावर पात्र व अपात्र यांची छाननी करून, संबंधितांचे राजेंद्रनगर येथील एसआरए योजनेत पुनर्वसन केले जाणार असल्याचे एसआरए प्रशासनाने सांगितले आहे़. परिणामी, शाळा सूरू होण्यापूर्वी या कुटुंबांना हक्काचे घर मिळेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे़ .......... 

यादी एसआरएकडे पाठविणारदांडेकर पूल येथील लाभार्थींची यादी पालिकेने यापूर्वीच एसआरए प्रशासनाला पाठविली होती; परंतु ती मिळाली नसल्याचेच एसआरएकडून सांगण्यात आल्याने, आम्ही उद्या (शनिवारी) ही यादी पुन्हा एसआरएकडे पाठविणार आहोत़. २५ सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेली २६ कुटुंबे पालिकेने शाळा क्रमांक १७ मध्ये स्थलांतरित केली असून, त्यांची सदस्यसंख्या ही ९२ इतकी आहे़.नव्याने काही कुटुंबे येथे घुसली असतील तर त्याची माहिती घेतली जाईल़ - माधव देशपांडे, उपायुक्त पुणे महापालिका़................

पात्रता तपासून पुनर्वसन करणार दांडेकर पूल येथील पात्र रहिवाशांची यादी कधीही एसआरएकडे पाठविण्यात आलेली नाही़ शाळेतील पूरग्रस्त कुटुंबांची यादी आमच्याकडे अद्यापही नाही़ त्यामुळे पालिकेने यादी पाठविली तरी पात्रता तपासून संबंधितांचे पुनर्वसन राजेंद्रनगर येथील एसआरएमध्ये केले जाणार असून, प्रथम येथे घुसलेल्या अनधिकृत कुटुंबांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाईल. - राजेंद्र निंबाळकर, एसआरए प्रमुख़

टॅग्स :PuneपुणेfloodपूरFamilyपरिवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSchoolशाळा