शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Pune | शिरूर तालुक्यात फ्लेक्स, बॅनरवर बंदी; विजयस्तंभ अभिवादनानिमित्त प्रशासनाची खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 10:48 IST

शिरूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये आदेश लागू....

कोरेगाव भीमा (पुणे) : विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावा, यासाठी प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या आदेशानुसार शिरूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये ३१ डिसेंबर २०२२ ते ५ जानेवारी २०२३ पर्यंत फ्लेक्स, बॅनरवर बंदी घालण्यात आली आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमअनुयायी येत असतात, अभिवादन कार्यक्रमानिमित्त अनेक ठिकाणी फ्लेक्स, बॅनर लावले जातात. त्यावर अनेकदा आक्षेपार्ह मजकूर असतो. त्यामुळे तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यापूर्वी फ्लेक्समुळे दोन समाजात वादावादी होऊन गुन्हे दाखल झाले होते. या अनुषंगाने ही खबरदारी घेण्यात आली आहे.

दरम्यान, कोणाला फ्लेक्स बॅनर लावायचे असतील तर त्यांनी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, जागामालक आणि संबंधित पोलिस ठाण्याची परवानगी घेणे आवश्यक राहील. दंड प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ प्रमाणे हा आदेश देण्यात आला आहे. सदर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही प्रांताधिकारी यांनी पोलिस प्रशासनास दिले आहेत. शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPoliceपोलिस