शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गिरीश महाजनांच्या विराेधात राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसची फ्लेक्सबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 18:48 IST

मुठा कालवा उंदीर, घुस, खेकड्यांमुळे फुटला असल्याचे वक्तव्य जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले हाेते, त्यांच्या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसकडून घेण्यात अाला अाहे.

पुणे : पुण्यातील मुठा कालवा फुटल्याने शेकडाे कुटुंब बेघर झाले असताना मुठा कालवा हा उंदीर, घुस, खेकड्यांमुळे फुटल्याचा शाेध पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांनी लावला हाेता. याच वक्तव्याचा पुनराेच्चार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केल्याने त्यांच्यावर अाता सर्वच स्तरातून टीका हाेत अाहे. राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसकडून गिरीश महाजनांच्या वक्तव्याचा समाचार घेतला अाहे. त्यांच्यावर टीका करणारा फ्लेक्स झाशीची राणी चाैकात लावण्यात अाला अाहे. 

    गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास मुठा कालवा फुटल्याने एकच हाहाकार उडाला. दांडेकर पुलाजवळील वसाहतीत कालव्याचे पाणी शिरल्याने येथील घरांचे माेठे नुकसान झाले. अनेकांचे सामान पाण्यात वाहून गेले, तर काहींचा संसार उघड्यावर पडला. कालव्याशेजारी टाकण्यात अालेल्या अनधिकृत केबल्समुळे हा कालवा फुटल्याची शक्यता वर्तवण्यात येत हाेती. परंतु हा कालवा केबल्समुळे नाही तर उंदीर, घुस, खेकड्यांनी जमीन पाेखरल्याने फुटल्याचा अजब शाेध पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांनी लावला हाेता. तसेच गिरीश महाजनांनी सुद्धा उंदीर, घुशी मुळेच हा कालवा फुटल्याची शक्यता असल्याचे वक्तव्य केले हाेते.  त्यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसने टीका केली अाहे. झाशीची राणी चाैकात लावण्यात अालेल्या फ्लेक्समध्ये महाजनांचा फाेटाे वापरण्यात अाला असून त्याखाली त्यांचे वक्तव्य लिहिण्यात अाले अाहे. त्याचबराेबर त्या खाली वेड्यांचा बाजार, पेढ्यांचा पाऊस असे लिहीण्यात अाले अाहे. 

    दर्शनी भागात हा फ्लेक्स लावण्यात अालेला असल्याने पुणेकरांच्या चर्चेचा विषय झाला अाहे. दरम्यान दांडेकर पूल वसाहतीतील बाधीत नागरिकांचे जनजीवन हळूहळू पुर्वपदावर येत असून ज्यांचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले अाहे असे अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत अाहेत. 

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाWaterपाणीnewsबातम्या