इंदापूर प्रशासकीय भवन येथे प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:09 IST2021-02-05T05:09:54+5:302021-02-05T05:09:54+5:30
यावेळी सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले तर निवासी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी उपस्थितींकडून संविधान प्रस्तावनेचे वाचन करून ...

इंदापूर प्रशासकीय भवन येथे प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण
यावेळी सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले तर निवासी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी उपस्थितींकडून संविधान प्रस्तावनेचे वाचन करून घेतले. इंदापूर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलिसांच्या पथकाने सहायक पोलीस निरीक्षक धनवे यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा ध्वजाला सलामी दिली व यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या पथकाने संचलन केले नाही, तर इतर शाळांचेही पथक यावेळी उपस्थित नव्हते. श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या बँड पथकाने सुरेल राष्ट्रगीत गायले व देशभक्तीपर गीत गायले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर नागरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, कै. अजित ढवळे फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे, पोलीस हवालदार गणेश झरेकर व सर्व प्रशासकीय अधिकारी व नगरसेवक राजकीय, सामजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक २७ इंदापूर प्रशासकीय भवन प्रजासत्ताक
फोटो ओळी : प्रशासकीय भवन येथे संविधान प्रस्तावनेचे वाचन करताना अधिकारी व नागरिक.