दौंडजमध्ये उत्साहात ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:17 IST2021-08-17T04:17:13+5:302021-08-17T04:17:13+5:30

डॉ. पतंगराव कदम विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दौंडज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या प्रांगणात एकत्र कार्यक्रमात ध्वजारोहण सोहळ्याचे ...

Flag hoisting in excitement in Daundaj | दौंडजमध्ये उत्साहात ध्वजारोहण

दौंडजमध्ये उत्साहात ध्वजारोहण

डॉ. पतंगराव कदम विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दौंडज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या प्रांगणात एकत्र कार्यक्रमात ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकर गोतपागर यांच्या शुभ हस्ते विद्यालयातील ध्वजारोहण करण्यात आले व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

या वेळी उपसरपंच श्रीमती नंदाताई कदम, ग्रामसेवक गिरी गोसावी, माजी सरपंच दत्तात्रय कदम, माजी सरपंच जगन्नाथ कदम, ग्रामपंचायत सदस्य रामदास भोसले, अलका महादेव माने, अर्चना भोसले, विजय मधुकर फाळके, गावचे पोलीस पाटील दिनेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार कदम, सुनील बांदल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा म्हेत्रे, डॉ. पतंगराव कदम विद्यालयाचे दिलीप निंबाळकर, भगवान तुपे, शोभा काळखैरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका सुवर्णा गार्डी, बालवाडी शिक्षिका व सेविका तसेच निवडक महिला व पुरुष पालक वर्ग उत्साहाने उपस्थित होते.

मोबाईलच्या माध्यमातून गुगल मीटचा वापर करून या सोहळ्याचे प्रक्षेपण विद्यार्थ्यांना व पालकांना घरबसल्या दाखवण्यात आले. कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी करून घेण्यात आले होते, अशी माहिती पोलिस पाटील नीलेश जाधव यांनी दिली.

Web Title: Flag hoisting in excitement in Daundaj