शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कंडोमच्या विल्हेवाटबाबत धोरण निश्चित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 19:02 IST

ब-याचदा लॅटेक्स नावाच्या रासायनिक घटकामुळे अविघटनशील कंडोम पर्यावरणासाठी धोकादायक कचरा ठरतात.

ठळक मुद्देलॉयर फॉर अर्थ जस्टीसच्या सदस्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) पर्यावरणहित याचिका  दाखलघनकच-याच्या व्याख्येनुसार वापरलेले कंडोम हा घनकचरा तसेच सॅनिटरी कचरा म्हणून ग्राह्य कंडोम निर्मिती कंपन्या आणि राज्य सरकारच्या काही विभागांना २८ आॅगस्ट रोजी हजर राहून म्हणणे मांडण्याचे अधिकार

पुणे : वापरलेले कंडोम हा अविघटनशील कचरा म्हणून गृहीत धरून त्याप्रमाणे वर्गीकरण आणि प्रक्रिया करून वापरलेले कंडोम नष्ट करावे. तसेच  कंडोमच्या विल्हेवाटबाबत धोरण निश्चित करावे, अशी मागणी करणारी पर्यावरणहित याचिका लॉयर फॉर अर्थ जस्टीसच्या सदस्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) दाखल केली आहे.      याचिकेबाबत न्यायमुर्ती सोनम वांगडी आणि डॉ. नगीन नंदा यांनी कंडोम निर्मिती कंपन्या आणि राज्य सरकारच्या काही विभागांना २८ आॅगस्ट रोजी हजर राहून म्हणणे मांडण्याचे अधिकार दिले आहे. विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी निखील जोगळेकर, बोधी रामटेके, विक्टर डांतास, ओमकार केणी आणि शुभम बिचे यांनी अ‍ॅड. असीम सरोदे यांनी माध्यमातून ही पर्यावरणहित याचिका दाखल केलेली आहे. वापरलेले कंडोम कागदात गुंडाळून फेकून देणे किंवा जाळून टाकले जातात. त्यामुळे ब-याचदा लॅटेक्स नावाच्या रासायनिक घटकामुळे अविघटनशील कंडोम पर्यावरणासाठी धोकादायक कचरा ठरतात. कंडोम निर्मितीच्या वेळेस वापरण्यात येणारे लुब्रीकंट (तेलीय घटक ) आणि स्पेरीसिडल कोटींग लॅटेक्स नावाचा घटक वापरून निर्मित केलेले कंडोम मोठ्या प्रमाणात अविघटनशील असण्याची क्षमता धारण करतात, अशावेळी वापरलेल्या कंडोमचा कचरा नीट वर्गीकरण होत नसल्याने विघटनशील कच-यात एकत्र होऊन पर्यावरणासाठी आणखी धोकादायक परिस्थिती निर्माण करतो असे याचिकेतून मांडण्यात आले आहे. तसेच कंडोम कच-याबाबत दाखल झालेली ही पहिलीच याचिका असल्याचे अ‍ॅड. सरोदे यांनी सांगितले. घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ तील नियम ३ (४६) मध्ये दिलेल्या घनकच-याच्या व्याख्येनुसार वापरलेले कंडोम हा घनकचरा तसेच सॅनिटरी कचरा म्हणून धरण्यात आलेले आहे. त्यामुळे नियम ४(१)(ब) नुसार वापरलेले कंडोम वेगळा कचरा म्हणून त्याचे व्यवस्थापन व्हावे, अशी मागणी याचिकेतून केली आहे.       न्यायालयाने याचिका करण्यामागील वैज्ञानिक दृष्टीकोन लक्ष्यात घेऊन प्रतिवादी पर्यावरण व वन मंत्रालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ , जिल्हाधिकारी पुणे, आरोग्य विभाग, शहरी विकास विभाग आणि तळेगाव नगरपरिषद यांनी तसेच कंडोम निर्मिती उद्योगात असलेल्या कंपन्यांना २८ आॅगस्ट रोजी हजर राहून याचिकेबाबत म्हणणे मांडण्याचे अधिकार दिले आहे.

 

टॅग्स :PuneपुणेenvironmentवातावरणCourtन्यायालयGarbage Disposal Issueकचरा प्रश्न