शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन ठिकाणी सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांच्या कारवाईत 5 महिला ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 15:33 IST

पोलिसांच्या या कारवाईत पाच महिलांना ताब्यात घेतले आहे...

पिंपरी : दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेश्याव्यवसाय प्रकरणी दोन कारवाया करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या दोन्ही कारवाईत पाच महिलांना ताब्यात घेतले आहे. गुरुवारी (दि. १७) या दोन्ही कारवाया करण्यात आल्या आहेत.पहिल्या कारवाईमध्ये संजय राजेंद्र एडके (वय ३६, रा. दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनीषा सुरज परखंदे (वय ३६, रा. साडेसतरानळी हडपसर), सारिका रामेश्वर भोसले (वय २३, रा. अक्षयनगर भोसरी), मनीषा संतोष चौधरी (वय ३२ रा. चिखली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास आरोपी महिला आळंदी रोडवर मॅक्झिन चौक येथे फिर्यादी आणि इतरांना अश्लील हावभाव करून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अडथळा होईल, त्रास होईल असे वर्तन करत होत्या. तसेच त्यांनी सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईमध्ये संतोष प्रल्हाद मुसळे (वय २२, रा. इंद्रायणीनगर, आळंदी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंजू अकबर मोडल (वय ३२, रा. बुधवार पेठ, पुणे), लाजो अबुल कासिम मिर शेख (वय ३१, रा. बुधवार पेठ, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास फिर्यादी देहूफाटा आळंदी येथे दुचाकीवरून जात होते. आळंदी चाकण रस्त्यावरती वाय जंक्शनच्या पुढे आरोपी महिलांनी फिर्यादी आणि इतरांना लैंगिक हावभाव करून शब्द उच्चारून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना अडथळा होईल व त्रास होईल असे वर्तन केले. तसेच सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल अशी कृती केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMolestationविनयभंग