शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला पाच हजार वर्षाच्या हिंदुत्वाचा इतिहास; चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 13:19 IST

भाजपा : काल आज आणि उद्या पुस्तक प्रकाशनात पाटील बोलत होते

पुणे : पुण्यात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपा : काल आज आणि उद्या’ या शांतनू गुप्ता लिखित व मल्हार पांडे यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन  झाले. या कार्यक्रमामध्ये फडणवीस यांच्यासोबतच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासहीत अन्य नेतेही उपस्थित होते. कार्यक्रमात भाजपला पाच हजार वर्षाच्या हिंदुत्वाचा इतिहास असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

पाटील म्हणाले, भाजप १९८० साली स्थापन झाला आहे. असे समजणारे खूप महान आहेत. हा खरतर त्यांच्या अज्ञानाचा भाग असू शकतो. ज्यांना प्रसिद्धीसाठी रोज काहीतरी बोलण्याची इच्छा होते. अशी लोक भाजप ८० साली स्थापन झाला. आणि त्यानंतर आम्ही गावोगावी नेलं असं त्यांना वाटते. परंतु भाजपलाही पाच हजार वर्षाच्या हिंदुत्वाचा इतिहास आहे. हे त्यांनी लक्षात ठेवावे. असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे लगावला. आता राज्यात नवी इकोसिस्टीम तयार झाली आहे. त्यामध्ये एकदा खोटं बोललं कि तेच सातत्याने बोलत राहायचं. मग लोकांनाही ते खरे वाटू लागते.  ज्यांना आम्ही पार्टी मोठी केली, गावोगावी नेली, आमच्यामुळे पार्टी मोठी झाली असं वाटण्याच्या स्थितीत हे पुस्तक प्रकाशित होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

मॅक्समूलरने खोटा इतिहास रुजवला; आर्य मूळचे भारतीयच

मॅक्समूलरने पद्धतशीरपणे ‘आर्य’ हे मध्य युरोपातून आल्याचा खोटा इतिहास रुजवला. तोच इतिहास आपल्याला हजारो, शेकडो वर्षे शिकविला गेला. मात्र, अनेक इतिहासकारांनी संशोधनातून ‘आर्य’ हे मूळचे येथील असल्याचे सिद्ध केले आहे. जगात सर्वात जुनी भारतीय संस्कृती आहे. राम मंदिर, कृष्ण मंदिर अथवा काशी विश्वेश्वर, सोमनाथाच्या मंदिराची केवळ तोडफोड नाही तर भारतीयांचा विचार, संस्कृती संपवणे हाच मोगलांचा डाव होता. तोच कित्ता पुढे इंग्रजांनी सुरू ठेवला. मशीद बांधणे हा उद्देश नव्हता तर भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या राम मंदिर, कृष्णाची मंदिरे, भारतीयांची संस्कृती नष्ट करण्याचा डाव होता, असा आरोप यावेळी  राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीhistoryइतिहासSanjay Rautसंजय राऊत