शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

अपघातात निगडीतील एकाच कुटुंबातील पाच ठार ; सात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 6:49 PM

पुणे सोलापूर महामार्गावर अपघात : मोटारीचा टायर फूटून

पळसदेव : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर निगडीतल एका कुटुंबावर काळाने झडप घातली. मोटारीचा टायर फुटल्याने पाच पलट्या खात विरूद्ध दिशेला येऊन दुसºया मोटारीला धडकली. या भीषण पाच जण जागीच ठार झाले. तर दोन जण जखमी झाले. तर दुसºया वाहनातील पाच जण जखमी झाले आहेत.इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर १ गावच्या हद्दीत  शुक्रवारी (दि.१८ )सायंकाळी साडेपाच वाजता हा अपघात झाला. अपघाताची भीषणता इतकी तीव्र होती की, मोटारीचा चक्काचूर झाल्याने दोन जणांचे मृतदेह गॅस कटरने मोटारीचा पत्रा कापून एक तासानंतर बाहेर काढण्यात आले.

शितल संदीप गायकवाड (वय ३२), संदीप प्रकाश गायकवाड ( वय ४0), आभिराज संदीप गायकवाड (वय ५)  , सुनिता प्रकाश गायकवाड (वय ५८), प्रकाश रामचंद्र गायकवाड (वय ६७,  सर्व राहणार नाना नानी पार्क, यमुना नगर निगडी) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. यात पती-पत्नी, मुलगा, सून व नातू यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये प्रमोद प्रकाश गायकवाड (वय ३२),  हेमा प्रमोद गायकवाड (वय २९) यांचा समावेश आहे. 

स्कॉर्पिओ मोटार सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जात होती. डाळज नंबर १ गावचे हद्दीत आली असता, मोटारीचा टायर फुटला. अन ही मोटार पाच पलटया खात सोलापूर बाजूकडे जात असलेल्या दुसºया मोटारीस धडकली. या झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पिओ मोटारीतील पाच जण जागीच ठार झाले.  तसेच दोन जण जखमी झाले आहेत. भरधाव वेग हाच अपघाताला कारणीभूत ठरला. अपघाताचा आवाज येताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच माहिती मिळताच, भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीळकंठ राठोड, पोलीस कर्मचारी रमेश भोसले, सचिन जगताप, गोरख पवार, वाघ, यांसह महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रथमत  जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पाठविले. रात्री उशिरापर्यंत मयत व जखमींची नावे मात्र समजू शकली नाहीत. भरधाव वेगाने घेतले बळीपुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघात होत आहेत. भरधाव वेग अन पुढे जाण्याची स्पर्धा यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. चारचाकी वाहने ससरासरी १४0 वेगाने जातात. या वेगामुळे टायर गरम होऊन फुटणे, ब्रेक निकामी होणे. यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र या कडे महामार्ग प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. स्पीड गण मशीन कधी बनविणार? महामार्गचे चौपदरीकरण झाले खरे. मात्र रस्ता सुसज्ज झाल्याने सहाजिकच वाहनांचा वेग वाढला. अन अपघातांचे प्रमाण वाढले. स्पीड मशीन बसविल्यास वाहनांचा वेग समजू शकेल. मात्र याबाबत कोणीच पुढाकार घेताना दिसत नाही. या भरधाव वेगाने अनेकांचे बळी घेतले आहेत.