विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 23:26 IST2018-05-16T23:26:53+5:302018-05-16T23:26:53+5:30

विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल
चाकण : चारित्र्याचा संशय घेऊन शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी विवाहितेचा पती, सासू, सासरा, नणंद व दीर असा पाच जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार अनिल ढेकणे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना मे २०१७ ते १२ डिसेंबर २०१७ दरम्यान खराबवाडी ( ता.खेड ) येथील पवार वस्तीवर घडली. प्रगती रवी भालेराव ( वय २१, रा. खराबवाडी, चाकण, ता.खेड, जि.पुणे, मुळगाव कोरनुळ, ता. जामजळकोट, जि. लातूर ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पती रवी निवृत्ती भालेराव, सासरे निवृत्ती गंगाराम भालेराव, सासू कमल निवृत्ती भालेराव, दीर राहुल निवृत्ती भालेरावव नणंद सुकेशनी सटवाजी काळे या पाच जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६५/२०१८, भादंवि कलम ४९८ (अ ), ३२३, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल ढेकणे हे पुढील तपास करीत आहेत.