दरोड्याच्या तयारीतील पाचजणांना अटक

By Admin | Updated: September 13, 2014 05:38 IST2014-09-13T05:38:13+5:302014-09-13T05:38:13+5:30

निगडीतील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना निगडी पोलिसांनी गजाआड केले.

Five people arrested for the robbery | दरोड्याच्या तयारीतील पाचजणांना अटक

दरोड्याच्या तयारीतील पाचजणांना अटक

पिंपरी : निगडीतील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना निगडी पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास निगडीतील अप्पूघरजवळील रावेत कॉर्नर येथे करण्यात आली.
बॉबी ऊर्फ सुरेश विलास यादव (वय २१, रा. पंचतारानगर, आकुर्डी), जिग्नेश परशुराम सावंत (वय २४, रा. मोरेवस्ती, चिखली), प्रसाद लक्ष्मण सुतार (वय २१, रा. आकुर्डी), अमित अशोक पांढरकर (वय ३२), विकी पोपट वाघ (वय २९, दोघेही रा. पंचतारानगर, आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पाचही आरोपी निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथील बालाजी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला.
आरोपी मोटारीतून रावेत कॉर्नर येथे आले असता मोटार अडविण्यात आली. त्यांच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मोटारीची तपासणी केली असता मोटारीत नायलॉन दोरी, दारूच्या बाटल्या, कटावणी, दोन नंबर प्लेट, मिरची पूड आढळून आल्या. त्यानंतर सर्व आरोपींना ताब्यात घेऊन मोटारीसह ३ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाचजणांना अटक करण्यात आली आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Five people arrested for the robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.