आणखी पाच जणांना अटक

By Admin | Updated: October 25, 2016 06:25 IST2016-10-25T06:25:58+5:302016-10-25T06:25:58+5:30

तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या खूनप्रकरणी सोमवारी (दि. २४) मध्यरात्री दीडला पाच जणांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत

Five more arrested | आणखी पाच जणांना अटक

आणखी पाच जणांना अटक


तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या खूनप्रकरणी सोमवारी (दि. २४) मध्यरात्री दीडला पाच जणांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व तळेगाव पोलिसांनी पुणे येथे व मावळ परिसरात ही कारवाई केली.
आज पाचही आरोपींना वडगाव न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शेळके खून प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे. मात्र मुख्य आरोपी श्याम दाभाडेसह त्याचे अन्य साथीदार फरार आहेत.
रुपेश सहादू घारे (वय २५ रा. महागाव, मावळ), राजेश दादाभाऊ ढवळे (वय ३० रा. रुपीनगर, तळवडे, हवेली), शिवाजी भरत आढाव (वय २४), अमित अनिल दाभाडे (वय २३, दोघेही रा. काले कॉलनी, पवनानगर, मावळ), सचिन लक्ष्मण ठाकर (वय २६, रा. ठाकूरसाई, मावळ) अशी आरोपींची नावे आहेत.
शेळके खूनप्रकरणी यापूर्वी अटक केलेले बंटी ऊर्फ शंकर रामचंद्र दाभाडे (वय ३५ रा. कोटेश्वरवाडी, मावळ,), संदीप सोपान पचपिंड (वय ३० रा. आंबी, मावळ), खंडू ऊर्फ पप्पू दत्तात्रय पचपिंड (वय ३० रा. माळवाडी, मावळ), आकाश दीपक लोखंडे (वय २१, रा. जोशीवाडा, तळेगाव दाभाडे) या चौघांच्याही पोलीस कोठडीत आज ३० आॅक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. (वार्ताहर)

पूर्ववैमनस्याच्या कारणावरून श्याम दाभाडे व त्याच्या साथीदारांनी मागील रविवारी (दि. १६) सकाळी येथील खांडगे पेट्रोलपंपाजवळील रस्त्यावर सचिन शेळके यांची गोळ्या घालून व धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण खून केला. या प्रकरणातील देवानंद खर्डे, नितीन वाडेकर, दत्ता वाघोले, सूरज गायकवाड, अभिषेक गायकवाड, अजय हिंगे हे संशंयित अद्याप फरारी आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक वसंत बाबर करीत आहेत.

Web Title: Five more arrested