शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पैशांसाठी तरुणाची नग्न धिंड काढणाऱ्या पाच जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 19:47 IST

पैशांच्या मागणीसाठी काही तरुणांनी मिळून एका तरुणाची नग्न अवस्थेत धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.याच प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे : पैशांच्या मागणीसाठी काही तरुणांनी मिळून एका तरुणाची नग्न अवस्थेत धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.याच प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यातून पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून तीन आरोपींचा शोध घेणे सुरु आहे. माणुसकीला काळीमा लावणारी ही घटना पुण्यातील हडपसर व खराडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात दरोडा, खंडणी, मारहाण आणि धमावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत तरुण हा मूळ कर्नाटक राज्यातील असून त्याने काही दिवसांपूर्वी पुण्यात गाडी दुरुस्तीचा व्यवसाय सुरु केला आहे. १६ तारखेला त्याच्याकडे जॅग्वार कंपनीची गाडी दुरुस्तीस आली. ही गाडी आरोपींच्या ओळखीने त्याच्याकडे दुरुस्तीस आली होती. त्यावेळी आरोपींनी त्याला दुरुस्तीच्या खर्चापेक्षा पाच लाख रुपये अधिक घेण्यास सांगितले, मात्र पिडीत तरुणाने अडीच लाख रुपये घेतले. त्याच रागातून  १६नोव्हेंबरच्या रात्री आठ तरुणांनी त्याला कोंढवा येथील गॅरेजमधून उचलले आणि हडपसर आणि खराडी परिसरात नेले. तेथे त्याचे कपडे उतरवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.  तसेच त्याची नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली. त्याला सिगरेटचे चटके देण्यात आल्याचा आरोपही त्याला केला आहे. शेवटी त्याला पहाटे साडेतीन वाजता गॅरेजजवळ सोडून आरोपी निघून गेले.  या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस