शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जितेंद्र जगताप आत्महत्याप्रकरणी पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 16:12 IST

जितेंद्र जगताप यांना धमकावण्यासाठी गेलेल्या आरोपींसह त्यांनी फोटो काढला होता. दीपक मानकर आणि सुधीर कर्नाटकी आणि हे सर्व माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये पोलिसांना सापडला होता.

ठळक मुद्देपोलिसांकडून चिठ्ठी व मोबाईलमधील फोटो जप्त रास्ता पेठेतील जागा ताब्यात द्यावी तसेच कोऱ्या कागदावर सही करावी, यासाठी जगताप यांच्यावर दबाव

पुणे : जमिनीच्या वादातून जितेंद्र जगताप यांनी केलेल्या आत्महत्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे़. विनोद रमेश भोळे (वय ३४, रा़ जोशी वाडी, घोरपडी पेठ), सुधीर दत्तात्रय सुतार (वय ३०,रा़ जयभवानी नगर, कोथरुड), अमित उत्तम तनपुरे (वय२८, रा़ मांडवी खुर्द), अतुल शांताराम पवार (वय ३६) आणि विशांत श्रीरंग कांबळे (वय ३०, रा़ शांतीनगर येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी उपमहापौर दीपक मानकर आणि बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. याप्रकरणी जगताप यांचा मुलगा जयेश जगताप (वय २८, रा़ घोरपडे पेठ) यांनी फिर्याद दिली आहे़. समर्थ पोलीस ठाण्यासमोरील ४८१ रास्ता पेठे ही जमीन जगताप यांच्या ताब्यात असून ते त्याची देखभाल करत होते़. या जमिनीचा ताबा मानकर व कर्नाटकी यांच्याकडे सुद्धा आहे़. जगताप यांनी ही जागा ताब्यात द्यावी तसेच कोऱ्या कागदावर सही करावी, असा दबाव मानकर आणि कर्नाटकी यांच्याकडून आणला जात होता़. या जमिनीचा देखभालीचा योग्य मोबदला दिल्यास कागदपत्रावर सही करु, असे जगताप यांनी त्यांना सांगितले होते़. त्यानंतर शनिवारी सकाळी विनोद भोळे व अन्य काही जण त्यांच्या रास्ता पेठेतील जागेवर गेले व त्यांना धमकावत जागेचा आजच्या आज ताबा देण्यास सांगितले़. त्यावेळी जगताप यांनी या सर्वांबरोबर फोटो काढला़. त्यानंतर घाबरलेले जगताप हे रिक्षातून घोरपडीला गेले़. त्यांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली़. त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली़. त्यात दीपक मानकर आणि सुधीर कर्नाटकी आणि फोटोमध्ये असलेल्या सर्वजणांच्या त्रासाला कंटाळून करत आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते़. पोलिसांनी ही चिठ्ठी व मोबाईलमधील फोटो जप्त केले असून त्यावरुन पाच जणांना अटक केली आहे़. समर्थ पोलीस अधिक तपास करत आहेत़.  

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिसArrestअटक