शिवसेनेच्या वतीने सर्वरोग निदान शिबिरात पाचशे रुग्णांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:10 IST2021-02-05T05:10:27+5:302021-02-05T05:10:27+5:30

डॉक्टरांद्वारे मोफत तपासणी केली व या आरोग्य शिबिरात रोगनिदान झालेल्या रुग्णांवर सवलतीत उपचार केले जाणार आहेत. शिबिरात एकूण ३११ ...

Five hundred patients participated in the camp on behalf of Shiv Sena | शिवसेनेच्या वतीने सर्वरोग निदान शिबिरात पाचशे रुग्णांचा सहभाग

शिवसेनेच्या वतीने सर्वरोग निदान शिबिरात पाचशे रुग्णांचा सहभाग

डॉक्टरांद्वारे मोफत तपासणी केली व या आरोग्य शिबिरात रोगनिदान झालेल्या रुग्णांवर सवलतीत उपचार केले जाणार आहेत. शिबिरात एकूण ३११ जनरल मेडिसिन रुग्ण तपासणी, ११० डोळे तपासणी केली पैकी ३१ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तपासणीनंतर ४० जणांना चष्मे वाटप केले व ५० रुग्णांची ईसीजीसह आवश्यक हृदयरोग तपासणी केली पैकी ५ रुग्णांवर हृदयरोग शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच हृदय होल ,पायाची शस्त्रक्रिया इतर अनेक प्रकारचे ऑपरेशन्स शासकीय योजनेंच्या माध्यामातून केले जाणार आहेत.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर म्हणाले, की केंद्रशासनाच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान तसेच राज्य शासनाच्या विविध योजनें अंतर्गत तालुक्यात प्रथमच अभियान राबविण्यात आले आहे. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख संजीव शिरोडकर ,उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर, पोलीस निरीक्षक नारायण पवार, वैशाली नागवडे, आप्पासाहेब पवार,वीरधवल बाबा जगदाळे, समिती नितीन दोरगे, रामभाऊ टुले,विकास खळदकर,मालन दोरगे ,देविदास दिवेकर उपस्थितीत होते.

२७ केडगाव शिबिर

चौफुला येथे शिवसेनेच्या वतीने सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन करताना महेश पासलकर, पोलीस निरीक्षक नारायण पवार व इतर.

Web Title: Five hundred patients participated in the camp on behalf of Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.