‘द्रुतगती’वर पाच गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:29 IST2017-08-15T00:29:26+5:302017-08-15T00:29:28+5:30
खंडाळा घाट संपल्यानंतर खोपोलीच्या हद्दीत किमी जवळ भरधाव इको कार समोर रस्त्यात बंद स्थितीत उभ्या असलेल्या ट्रेलरवर मागून धडकली.

‘द्रुतगती’वर पाच गंभीर जखमी
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुण्याहून मुंबईकडे जाणाºया मार्गिकेवर खंडाळा घाट संपल्यानंतर खोपोलीच्या हद्दीत किमी जवळ भरधाव इको कार समोर रस्त्यात बंद स्थितीत उभ्या असलेल्या ट्रेलरवर मागून धडकली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात
एवढा भयंकर होता की,
गाडीमधील एक महिला वगळता जखमी सर्वजण गाडीत अडकले होते. जखमींमधील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघाताची माहिती समजल्यानंतर तातडीने घटनास्थळी दाखल झालेले खोपोली पोलीस, आर्यन देवदूत बचाव पथक, आयआरबी व डेल्टाचे कर्मचारी, अपघातग्रस्तांच्या मदतीला या रेस्क्यूपथकाचे प्रतिनिधी या सर्वांनी मिळून गाडीचा पत्रा कापून काढत सर्व जखमींना गाडीतून बाहेर काढत उपचारासाठी पवनेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. जखमींमधील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.