संग्राम घोडेकर हल्ला प्रकरणी पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:26 IST2021-01-13T04:26:53+5:302021-01-13T04:26:53+5:30
दरम्यान , संग्राम घोडेकर यांच्यावर हल्ला करण्यासाठी आरोपींना मुख्य सूत्रधार असलेला आरोपी चंद्रशेखर निवृत्ती कोऱ्हाळे याने कुविख्यात गुंड गणेश ...

संग्राम घोडेकर हल्ला प्रकरणी पाच जणांना अटक
दरम्यान , संग्राम घोडेकर यांच्यावर हल्ला करण्यासाठी आरोपींना मुख्य सूत्रधार असलेला आरोपी चंद्रशेखर निवृत्ती कोऱ्हाळे याने कुविख्यात गुंड गणेश उर्फ गणी रामचंद्र नाणेकर यास सुपारी दिली होती , नाणेकर याने अजय उर्फ सोन्या राठोड याच्या करवी प्राणघातक हल्ला करविला हे तपासात स्पष्ट झाले आहे .
या प्राणघातक हल्ला प्रकरणात यापूर्वी मुख्य सूत्रधार चंद्रशेखर निवृत्ती कोऱ्हाळे यांना अटक करण्यात आली तर आज पोलीस पथकाने गणेश उर्फ गणी नाणेकर( रा .नाणेकरवाडी, चाकण) अजय उर्फ सोन्या राठोड (वय २३( रा. १४ न. ता. जुन्नर ) हल्ला करण्यापूर्वी घोडेकर यांच्यावर पाळत ठेवणारा खबऱ्या संदीप बाळशीराम पवार (वय २०रा. पिंपळवंडी ता. जुन्नर) यांच्यासह अन्य दोन अल्पवयीन हल्लेखोर मुलांना पोलिसांनी चाकण येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. या प्रकरणातील दुसरा सूत्रधार प्रशांत माने( रा . नारायणगाव )हा फरार आहे .
गुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार , संग्राम घोडेकर याच्यावर ७ जानेवारी रोजी हल्ला करून फरार झालेले दोन अल्पवयीन गुन्हेगार व अजय उर्फ सोन्या राठोड हा अलिबाग या ठिकाणी वास्तव्यास होते . या घटनेतील दुसरा सूत्रधार प्रशांत माने व सुपारी किंग गणेश उर्फ गणी नाणेकर या दोघांची पूर्वीची मैत्री होती त्यांनी शेखर कोऱ्हाळे यांच्याबरोबर डिसेंबर २०२० मध्ये या हल्ल्याबाबतची आखणी केली होती . या प्रकरणात अल्पवयीन मुलांचा वापर केल्यावर जामीन लवकर होऊन मुलांना सोडवता येईल म्हणून त्यांनी त्या घटनेत अल्पवयीन मुलांचा वापर प्लानिंग केले . त्यानुसार गणेश नाणेकर याने सुपारी घेऊन ही जबाबदारी सोन्या राठोडवर सोपवली . हल्ला करण्यापूर्वी संदीप पवार हा संग्राम घोडेकर यांच्यावर पाळत ठेवून होता , त्यानुसार पवार यांनी अजय उर्फ सोन्या राठोडला संग्राम घोडेकर यांच्या हालचालीची माहिती देऊन सोन्या राठोड याने दोन अल्पवयीन मुलांना बरोबर घेऊन संग्राम घोडेकर यांच्यावर कोल्हे मळा येथे कोयत्याने हल्ला चढवला . या हल्ल्यानंतर मुख्य सूत्रधार चंद्रशेखर को-हाळे याला पोलिसांनी अवघ्या सहा तासाच्या आत ताब्यात घेतले व पुढील गुन्हेगार तीन दिवसांत शोधून काढू असे आश्वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी ग्रामस्थांना दिले होते . त्यानुसार तीन दिवसाच्या आत यातील हल्लेखोर व सुपारी घेणाऱ्यास नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्याने नारायणगाव ग्रामस्थांमधून या अधिकाऱ्याचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.
हि कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख ,उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव पोलिस उपनिरिक्षक गुलाबराव हिंगे, पोलीस नाईक दिनेश साबळे ,पोलीस नाईक धनंजय पालवे , पो. कॉ. सचिन कोबल, शैलेश वाघमारे, शाम जायभाये, योगेश गारगोटे पोलीस मित्र भरत मुठे यांच्या पथकाने केली केली.
दरम्यान , गणेश नाणेकर याचेवर पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत , तर हल्लेखोर अजय उर्फ सोन्या राठोड याच्यावर चोरी, अपहरण करून खून करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
नारायणगाव येथे संग्राम घोडेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. के. गुंड व पोलीस कर्मचारी