शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

साखरे वस्तीत पाच एकर ऊस जळून खाक; लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 23:19 IST

आधीच आयटीपार्कमध्ये शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

हिंजवडी : आयटीनगरी हिंजवडी येथे काढणीला आलेला सुमारे पाच एकर ऊस आगीत जळून खाक झाला. हाती आलेल्या पिकाला अचानक आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले, यामुळे हिंजवडी ग्रामस्थांची चांगलीच धावपळ उडाली. शेतातून गेलेल्या एमएसईबीच्या खांबावरील वायर मध्ये शॉर्टसर्किट झाल्याचा अंदाज शेतकरी ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, आधीच आयटीपार्क मध्ये शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यात काही शेतकरी आपला वडिलोपार्जित शेती व्यवसाय आजही टिकवून आहे. मात्र, आधीच आसमानी आणि सुलतानी संकटामुळे हवालीदिल झालेला शेतकरी आशा नुकसानकारक घटनांमुळे अजून संकटात सापडलेला आहे. हिंजवडीचे माजी सरपंच आणि प्रगतशील शेतकरी विक्रम साखरे यांच्याशी बोलले असता, गेल्या वर्षी सुद्धा अशीच शेतातील हाती आलेल्या उभ्या पिकाला एमएससीबी च्या खांबावरील वायरच्या शॉर्ट शॉर्टकट मुळे आग लागून  लाखोंचे नुकसान झाले होते. ती नुकसान भरपाई सोडाच, मात्र, यंदाही असाच प्रकार घडल्यामुळे, शेती करावी की नाही असा प्रश्न हिंजवडीतील शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. हिंजवडी परिसरात पिकांना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने, असं का होतंय, याला कोण जबाबदार आहे याची तपासणी करण्याची आग्रही मागणी हिंजवडीतील शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.

टॅग्स :fireआगPuneपुणे