शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र बऱ्हाटेच्या ५ साथीदारांच्या नंदूरबारहून अटक; गेल्या पाच महिन्यांपासून पोलिसांना देत होते गुंगारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 20:13 IST

विशेष सत्र न्यायालयाने सर्व आरोपींचे पकड काढले होते वॉरंट.

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे व इतर १३ आरोपींविरुद्ध गेल्या वर्षी धमकावून जबरदस्तीने जागा बळकाविणे, खंडणी मागणे अशा विविध कलमाखाली हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात १३ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर अनेक आरोपी फरार झाले होते. गेली ५ महिने हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. विशेष सत्र न्यायालयाने सर्व आरोपींचे पकड वॉरंटही काढले होते. मात्र बऱ्हाटे याच्या ५ साथीदारांना नंदूरबार येथे जाऊन सापळा रचून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

विशाल शिवाजी ढोरे (वय ३६), अस्लम मंजूर पठाण (वय २४), सचिन गुलाब धिवार (वय ३२), परवेज शब्बीर जमादार (वय ३९, रा. बालाजी विश्वनाथ लाखाडे (वय २७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या कारवाईची माहिती दिली. यावेळी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्च्नसिंह उपस्थित होते. पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये गुन्हे शाखेचे स्वतंत्र तपास पथक तयार केले होते. त्यापैकी युनिट ५ कडील अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक गोपनीय माहितीचा आधार घेऊन शोध घेत होते. विशाल ढोरे हा इतर चार आरोपींना सोबत घेऊन महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, धुळे व इतर ठिकाणी लपून गुंगारा देत होता. युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे व सहकार्यांना हे आरोपी नंदुरबार येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथक तातडीने नंदुरबारला पोहचले व ते लपले होते, त्याठिकाणी छापा घालून ५ जणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह वेगवेगळ्या कंपनीचे सीम कार्ड, २ चारचाकी मोटार जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यात १३ पैकी ११ आरोपींना पकडण्यात यश आले आहे. मुख्य सुत्रधार रवींद्र बर्हाटे हा अद्याप फरार आहे. न्यायालयाकडून त्याला फरारी घोषित करण्यात आले आहे.

ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, प्रसाद लोणारे, उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, प्रमोद टिळेकर, महेश वाघमारे, विशाल भिलारे, विनायक जाधव, प्रविण काळभोर, अंकुश जोगदंड, विलास खंदारे, संजय दळवी, स्नेहल जाधव या पथकाने केली आहे.

टॅग्स :Puneपुणेnandurbar-acनंदुरबारPoliceपोलिसArrestअटक