आधी काम, मग मिळतोय चारा
By Admin | Updated: May 11, 2017 04:10 IST2017-05-11T04:10:44+5:302017-05-11T04:10:44+5:30
मेंढपाळांना आपली बकरी शेतात बसवण्यासाठी यापूर्वी शेतकरी धान्य द्यायचे किंवा काही शेतकरी चारा देऊनही दिवसानुसार

आधी काम, मग मिळतोय चारा
लोकमत न्यूज नेटवर्क
कारेगाव : मेंढपाळांना आपली बकरी शेतात बसवण्यासाठी यापूर्वी शेतकरी धान्य द्यायचे किंवा काही शेतकरी चारा देऊनही दिवसानुसार काही ठराविक रक्कम द्यायचे. परंतु आता चारा हवा असल्यास शेतकऱ्यांच्या शेतात मेंढपाळाना राबावे लागत आहे. त्यामुळे मेंढपाळ अडचणीत
सापडला आहे.
पुणे जिल्ह्यात कांदाकाढणी अंतिम टप्प्यात आली आहे. कांदापातीचे पाच ते सहा महिने बकरीसाठी खाद्य उपलब्ध होते. परंतु, आधी कांदाकाढणी करा व त्यानंतर दररोज कांदाकाढणी होईपर्यंत कामासाठी मेंढपाळ महिला जात आहेत. त्यामुळे चारा मिळण्यासाठी मेंढपाळाना शेतकऱ्यांच्या शेतात राबावे लागत आहे. उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे सकाळी लवकरच बकरी चारणी करण्यासाठी सोडावी लागत आहेत. त्यामुळे पहाटे उठून मेंढपाळ शेतात राबत आहेत. कोणतेही पीक निघाल्यानंतर त्यात असणारे गवत बकरी खाते. त्यामुळे शेतातील तण आपोआप नष्ट होते.
गवत बकरीने खाल्ल्याने शेतकऱ्यांच्या कष्टात बचत होते. तसेच बकरीपासून मिळणारे लेंडीखत जमिनीतील सुपीकता वाढवते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मेंढपाळ आहे.
तसेच पुणे जिल्ह्यात कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होतो. परंतु याच चारासाठी मेंढपाळ दिवसभर शेतकऱ्यांच्या शेतात राबत आहेत. त्यामुळे एकीकडे चारा नसल्याने मेंढपाळ अडचणीत आला आहे, तर दुसरीकडे त्याला चारा मिळवण्यासाठी कष्ट करावे लागत आहे.
बकरी चारावयाची असल्यास सगळा कांदा काढावा लागतो. काही शेतकरी थोडीफार मजुरी म्हणून पैसे मेंढपाळांना आपली बकरी शेतात बसवण्यासाठी यापूर्वी शेतकरी धान्य द्यायचे किंवा काही शेतकरी चारा देऊनही दिवसानुसार काही ठराविक रक्कम द्यायचे. परंतु आता चारा हवा असल्यास शेतकऱ्यांच्या शेतात राबावे लागत आहे.
त्यामुळे मेंढपाळ अडचणीत सापडला आहे, तर काही शेतकरी पैसे देत नाहीत. चारा उपलब्ध होत नसल्याने नाईलाज असूनही काम करावे लागत आहे. काम नाही केले तर कोणी चारा देत नाही. दिवसभर बकरी चारायची की काम करायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे, असे मेंढपाळ पांडा कचरे यांनी सांगितले.