शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पुण्यातून कामगारांना घेऊन पहिली रेल्वे मध्यप्रदेशला रवाना; डोळ्यात आनंदाश्रू अन् मनात आभाराची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 18:32 IST

एमआयडीसी सुरू झाल्याने ३००-३५० कामगारांनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय केला रद्द  

ठळक मुद्देखासगी बस, स्पेशल रेल्वेद्वारे कामगारांना आपल्या राज्यात सोडण्याची तयारी सुरूजिल्ह्यातील सर्व एमआयडीसीमध्ये उद्योग धंदे पूर्ववत सुरू होत असून, कामगारांची मोठी गरज कामगारांनी आपल्या गावी जाण्याची घाई करू नये असे आवाहन

पुणे: पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या मध्यप्रदेश येथील सुमारे १२०० कामगारांची शिरूर तहसीलदार कार्यालयामार्फत वैद्यकीय तपासणी पूर्ण करून यादी तयार करण्यात आली.या कामगारांना घेऊन जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वयक साधून रेवा (मध्ये प्रदेश) स्पेशल श्रमिक रेल्वे बुक केली.परंतु रांजणगाव एमआयडीसीमधील उद्योग धंदे होऊन कामगारांना काम मिळण्यास सुरवात झाल्याने ऐनवेळी ३०० ते ३५० कामगारांनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय रद्द केला. यामुळे गुरूवारी सायंकाळी ५ वाजता ८५० ते ९०० कामगारांना घेऊन पुणे जिल्ह्यातील पहिली रेल्वे मध्ये प्रदेशला रवाना झाली, अशी माहिती उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली.राज्यात आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २४ मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा केली. तेव्हापासून पुणे जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी व अन्य क्षेत्रातील सर्व उद्योग-धंदे, कारखाने व खाजगी आस्थपना बंद आहेत. हातांना काम नसल्याने व पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये दररोज कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने कामगारांमध्ये प्रचंड धास्तीचे वातावरण आहे. कामगारांची उपासमार होऊन नये म्हणून जिल्हा प्रशासनाने खाण्याची व राहण्याची सोय केली. परंतु तरी देखील प्रचंड मोठ्या संख्येने कामगारांना आपल्या गावाकडे जाण्याची ओढ लागली होती. यावेळी घरी सुखरूप जाताना  कामगारांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि सहकार्य केल्यामुळे प्रशासनाबद्दल मनात आभाराची भावना दाटून आली होती.

अखेर राज्य शासनाने व केंद्र शासनाने ३ मे नंतर लॉकडाऊन शिथिल करून कामगारांना आपल्या गावाकडे जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानूसार जिल्हा प्रशासनाने कोणत्या राज्यात, जिल्ह्यात किती कामगार जाणार यांच्या याद्या तयार करून खासगी बस, स्पेशल रेल्वेद्वारे कामगारांना आपल्या राज्यात सोडण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये गुरूवार (दि.७) रोजी मध्ये प्रदेशमध्ये जाणाऱ्या सुमारे कामगारांसाठी रेवा (मध्ये प्रदेश) स्पेशल श्रमिक रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. परंतु सायंकाळी काही कामगारांनी आपण जाणार नसल्याचे कळविले. यामुळे सायंकाळी ५ वाजता ८५० ते ९०० कामगारांना घेऊन पुणे जिल्ह्यातील पहिली रेल्वे मध्यप्रदेशला रवाना झाली, अशी माहिती उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली.------- कामगारांनी जाण्याची घाई करू नये राज्यात प्रतिबंधित क्षेत्राताबाहेर निर्बंध शिथील करण्यात आली आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्याही औपचारिक परवानगीची, पासेसची गरज नाही, असे स्पष्ट केले आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतेक सर्व एमआयडीसीमध्ये उद्योग धंदे पूर्ववत सुरू होत असून, कामगारांची मोठी गरज आहे. यामुळे कामगारांनी आपल्या गावी जाण्याची घाई करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
......मध्यप्रदेशमध्ये जाणाऱ्या कामगारांना फूड पॅकेट व होमिओपॅथी गोळ्या...पुणे जिल्ह्यातून मध्ये प्रदेशमध्ये स्पेशल रेल्वेद्वारे जाणाऱ्या कामगारांना रेल्वे प्रवासात रात्रीच्या जेवणासाठी जिल्हा प्रशासनाकडून खाजगी संस्थांच्या मदतीने फूड पॅकेट, प्रत्येक दोन पाणी बाटल्या व होमिओपॅथी गोळ्या देखील देण्यात आले असल्याचे उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेMIDCएमआयडीसीState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारMadhya Pradeshमध्य प्रदेश