शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ससून रुग्णालयात पहिली यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया;अत्याधुनिक उपचार आता गरजू रुग्णांसाठीही उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 16:25 IST

ससून रुग्णालयात पहिल्यांदाच एका तरुण महिलेवर अत्याधुनिक रोबोटिक प्रणालीद्वारे पित्ताशयाची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. ही शस्त्रक्रिया पूर्णतः सरकारी यंत्रणेद्वारे आणि गरजू रुग्णांसाठी विनामूल्य करण्यात आली

पुणे : बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय इतिहासात एक नवा मैलाचा दगड ठरणारी घटना नुकतीच घडली आहे. ससून रुग्णालयात पहिल्यांदाच एका तरुण महिलेवर अत्याधुनिक रोबोटिक प्रणालीद्वारे पित्ताशयाची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. ही शस्त्रक्रिया पूर्णतः सरकारी यंत्रणेद्वारे आणि गरजू रुग्णांसाठी विनामूल्य करण्यात आली आहे.

महिला रुग्णास पोटदुखीच्या तक्रारीमुळे ससून रुग्णालयात दाखल केले होते. तपासणीत पित्ताशयात खडे असल्याचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सुसज्ज ऑपरेशन थिएटरमध्ये अत्याधुनिक रोबोटिक प्रणालीच्या सहाय्याने ही शस्त्रक्रिया अत्यंत अचूकतेने व सुरक्षित पद्धतीने पार पडली.

या शस्त्रक्रियेसाठी कुशल वैद्यकीय पथकाची साथ लाभली आहे. या पहिल्या रोबोटिक शस्त्रक्रियेचे नेतृत्व शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. लता भोईर यांनी केले. त्यांच्या सहकार्याने डॉ. आशिष चव्हाण, डॉ. सागर कुर्कुरे आणि डॉ. पुनिमा अग्रवाल यांनी शल्यचिकित्सक म्हणून सहभाग घेतला. शस्त्रक्रियेवेळी भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. नेहा कांबळे, डॉ. सुजित क्षीरसागर आणि डॉ. अनुजा यांनी जबाबदारी पार पाडली. तसेच, ऑपरेशन थेटरमध्ये शस्त्रक्रिया परिचारिका प्रमुख राजश्री कानडे, उज्ज्वला गरुड, शमा बांदिसोडे आणि साधना धोमसे यांनी सेवा दिली.

या शस्त्रक्रियेच्या यशामागे मागील काही महिन्यांपासून रुग्णालयात ज्रूरु असलेले प्रशिक्षण आणि नियोजन हे प्रमुख कारण ठरले. डॉक्टर, नर्सेस व शस्त्रक्रिया सहायक यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी ससून रुग्णालयात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सर्जिकल सिम्युलेटरचा प्रभावी वापर करण्यात आला. रोबोटद्वारे शस्त्रक्रिया होण्यासाठी स्वतंत्र आणि अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरची उभारणीदेखील करण्यात आली. ससून रुग्णालयात रोबोटिक तंत्रज्ञानावर आधारित आणखी शस्त्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असून, ही सुविधा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास वैद्यकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

रोबोटिक शस्त्रक्रियेचे फायदे : अधिक अचूक आणि सूक्ष्म पद्धतीने शस्त्रक्रिया, पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी वेदना, लवकर बरे होणे आणि रुग्णालयातून त्वरित डिसचार्ज, क्लिष्ट व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित. 

खासगी रुग्णालयांमध्ये अशा रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी ३ ते ५ लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र ससून रुग्णालयात तीच सुविधा गरजू रुग्णांना पूर्णतः विनामूल्य दिली जात आहे. आम्ही नेहमीच गरजूंना दर्जेदार आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देण्यास कटिबद्ध आहोत.- डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयरोबोटिक शस्त्रक्रिया हे तंत्रज्ञान सामान्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. कर्करोग, हर्निया यांसारख्या गुंतागुंतीच्या विकारांवर अधिक अचूकतेने उपचार करणे शक्य झाले आहे. विशेषत: सरकारी रुग्णालयात अशा प्रकारची अत्याधुनिक सुविधा उपचारासाठी उपलब्ध झाली आहे. - डॉ. लता भोईर, विभागप्रमुख शल्य चिकित्साशास्त्र, ससून

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्य