खेड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजगुरूनगर येथील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांला शिक्षकाने वळ उठेपर्यत मारहाण केल्याची घटना शनिवारी ( दि. १३ ) घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शैलेश रणदिवे, (वय ६ वर्षे ),नेहरू चौक,राजगुरूनगर असे विद्यार्थ्याचे नाव आहे. शिक्षक लक्ष्मण कडलग असे मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. शनिवारी सकाळची शाळा असल्यामुळे सकाळी नऊ वाजता शिक्षक व काही विद्यार्थी वर्गाबाहेर जात असताना समीर या विद्यार्थ्याने वर्गातील बेंच वाजवल्याच्या कारणावरून कडलग यांना राग आला. त्यांनी मुलाच्या पाठीवर वळ उमटेपर्यंत बदम मारहाण केली. शाळा सुटल्यानंतर समीरने हा प्रकार घरी आईला सांगितला. तसेच त्याच्या पाठीवर मारहाण केल्याचे वळ पाहता त्याला तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. याबाबत मुलाच्या आईने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे ...................पहिल्या मजल्यावरुन काही विद्यार्थ्यांना घेऊन खाली आलो असता समीर यांने मोठ्या आवाजात बेंच वाजवत होता. शाळेत इतर वर्ग आहेत. त्यांना या आवाजाचा त्रास होऊ नये. तसेच मुलाला शिस्त लागावी यासाठी किरकोळ हाताने मारहाण केली.- लक्ष्मण कडलग, प्राथमिक शिक्षक
राजगुरुनगर येथे शिक्षकाची पहिलीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 14:37 IST
विद्यार्थ्याने वर्गातील बेंच वाजवल्याच्या कारणावरून शिक्षकाने त्याला वळ उठेपर्यत मारहाण केली.
राजगुरुनगर येथे शिक्षकाची पहिलीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण
ठळक मुद्देयाबाबत मुलाच्या आईने खेड पोलीस ठाण्यात दिली तक्रार