पहिला राम नदी महोत्सव ८ जानेवारीपासून रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:26 IST2021-01-08T04:26:46+5:302021-01-08T04:26:46+5:30

पुणे : पहिला ‘राम नदी महोत्सव दि. ८ ते १० जानेवारी दरम्यान ऑनलाइन होणार आहे. राम नदीच्या ...

The first Ram Nadi Mahotsav will be held from January 8 | पहिला राम नदी महोत्सव ८ जानेवारीपासून रंगणार

पहिला राम नदी महोत्सव ८ जानेवारीपासून रंगणार

पुणे : पहिला ‘राम नदी महोत्सव दि. ८ ते १० जानेवारी दरम्यान ऑनलाइन होणार आहे. राम नदीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी तज्ज्ञांची व्याख्याने, लघुपट, स्थानिक नागरिकांनी कथन केलेल्या जुन्या आठवणी, राम नदीचे भारूड, राम नदी संगमाचा आभासी ‘इको ट्रेल’ अशा विविध कार्यक्रमांचा समावेश या पाच दिवसीय महोत्सवात आहे.

गतवर्षी किर्लोस्कर वसुंधराच्या पुढाकाराने ‘राम नदी पुनरुज्जीवन अभियान’ सुरू करण्यात आले. कोव्हिडच्या काळातही रामनदी पुनरुज्जीवनाचे काम नेटाने सुरू ठेवण्यात आले. त्यातूनच ‘राम नदी महोत्सवा’ची निर्मिती करण्यात आली. या पहिल्या ‘राम नदी महोत्सवा’चे उद्घाटन शुक्रवारी (८ जानेवारी) सायंकाळी ६ वाजता अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते होणार असून, याप्रसंगी महोत्सवाच्या निमंत्रक आरती किर्लोस्कर आणि गौरी किर्लोस्कर आपली भूमिका मांडणार आहेत. किर्लोस्कर वसुंधराचे महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी मंगळवारी (दि. ५) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या वेळी वसुंधरा स्वच्छता अभियानाचे अनिल गायकवाड, इकॉलॉजिकल सोसायटीचे डॉ. गुरुदास नूलकर, जीवित नदीच्या शैलजा देशपांडे, विनोद बोधनकर, के. ओ. इ. एल. चे निनाद पाटील, आर्किटेक्ट ज्योती पानसे आदी मान्यवर उपस्थित होते.

या महोत्सवात ‘राम नदीचे झरे व नाले’ याविषयी शैलेंद्र पटेल, समृध्द तळ्यांची राम नदी’ याविषयी डॉ. गुरुदास नूलकर, नागरिकांचे आरोग्य आणि स्वच्छता’ याविषयी डॉ. सुरेश मिजार विषमुक्त राम नदी’ याविषयी शैलजा देशपांडे, ‘पाणलोट क्षेत्राचे व्यवस्थापन’ याविषयी ज्योती पानसे, ‘प्रकल्प व्यवस्थापन पध्दत’ याविषयी निनाद पाटील आदींची व्याख्याने होणार आहेत.

Web Title: The first Ram Nadi Mahotsav will be held from January 8