गुडघेदुखीवर पहिली फ्लॅबेक्टॉमी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST2021-07-07T04:12:00+5:302021-07-07T04:12:00+5:30

फ्लॅबेक्टॉमी शस्त्रक्रिया करताना त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध नसल्याने डॉ. अनुज गजभिये यांच्यासमोर शस्त्रक्रियेचे आव्हान निर्माण झाले होते. ही एक ...

First phlebactomy surgery on knee pain | गुडघेदुखीवर पहिली फ्लॅबेक्टॉमी शस्त्रक्रिया

गुडघेदुखीवर पहिली फ्लॅबेक्टॉमी शस्त्रक्रिया

फ्लॅबेक्टॉमी शस्त्रक्रिया करताना त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध नसल्याने डॉ. अनुज गजभिये यांच्यासमोर शस्त्रक्रियेचे आव्हान निर्माण झाले होते. ही एक संपूर्ण प्रक्रिया दुर्मिळ होती. रुग्णाच्या सविस्तर अभ्यासानंतर आणि जगभर सर्वत्र उपलब्ध साहित्यातून संशोधन करून पार पाडायची होती. रक्तवाहिन्या आणि नसा दृष्टीने उच्च धोक्याचे मानले जाते. कोणतीही पोस्ट-ऑपरेटिव्ह गुंतागुंत नव्हती आणि तिसऱ्या दिवशी रुग्णाला सोडले. डॉ. गजभिये हे गेली काही वर्षे पुण्यात हाडाच्या विकारांवर उपचार करत आहेत. त्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार ज्या रुग्णांना आधीपासूनच कोणताही विकार- जसे हाडांचे विकार, हृदयविकार किंवा इतर आजार होते त्यांची तीव्रता वाढतेय. कारण, कोरोनाच्या काळात नियमित उपचार किंवा तपासणी करता न आल्याने रुग्णांचे आजार बळावताहेत.

कोरोनाच्या काळात व्यायाम सुटला आहे. वयोमानानुसार हाडांची झीज होत असतेच, ती थांबवता येत नाही. परंतु नियमित तपासणी, व्यायाम या गोष्टी रुग्णाच्या व्याधी नियंत्रित करून नियमित जगणं सुखकर करतात. त्यामुळे सहव्याधी असणाऱ्या वयस्कर व्यक्तींच्या नियमित जीवनात अडथळे येत आहेत. त्याचबरोबर घरून काम करणाऱ्या व्यक्तींच्या कामाच्या तासांत वाढ झाल्याने, एकाच जागी बसून सतत मान खाली घालून काम करत राहिल्याने शरीराच्या ठेवणीवर परिणाम झालेला दिसून येतो आहे तो म्हणजे मणक्याचे विकार वाढताहेत. ज्यांना सांधेदुखी किंवा तत्सम आजार होते, त्यात वाढ झाल्याचेही दिसून येते आहे. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्येही रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असल्याने बरे झाल्यानंतर, त्यांच्यामध्येही हाडाच्या विकारांची गुंतागुंत आढळते आहे. या रुग्णांमध्ये अथ्रारायटिससारख्या समस्या निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. हाडाची झीज होते. म्हणजे हाडाच्या दृष्टीने हे बूमरँग आहे. त्यातही घरी खुर्चीवर न बसता गादीवर, सोफ्यावर बसतो तेव्हा शरीराच्या ठेवणीकडे लक्ष देत नसतो. ताठ बसणे, मान सरळ राहाणे आदीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट आपण करू शकतो की, घरी असलो तरीही शरीराच्या ठेवणीकडे योग्य लक्ष देऊ शकतो. व्यायाम करतानाही कोणतेही व्हिडिओ वगैरे पाहून करण्यापेक्षा हाडाचे कोणतेही त्रास होत असतील, तर तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणे श्रेयस्कर असते, असेही ते सांगतात.

Web Title: First phlebactomy surgery on knee pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.