मनसेची पहिली यादी येत्या चार दिवसांत

By Admin | Updated: September 13, 2014 23:55 IST2014-09-13T23:55:51+5:302014-09-13T23:55:51+5:30

विधानसभा निवडणुकीसाठीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिली यादी येत्या मंगळवारी अथवा बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

The first list of MNS in the next four days | मनसेची पहिली यादी येत्या चार दिवसांत

मनसेची पहिली यादी येत्या चार दिवसांत

पुणो : विधानसभा निवडणुकीसाठीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिली यादी येत्या मंगळवारी अथवा बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. पुण्यातील इच्छुक उमेदवारांच्या वैयक्तिक मुलाखती येत्या दोन दिवसांत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे घेणार असल्याचेही सूत्रंनी स्पष्ट केले. मात्र, या मुलाखती पुण्यात होणार की मुंबईत, हे अद्यापही गुलदस्तातच आहे.
विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी राजकीय पक्षांना केवळ 3क् दिवसांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर उमेदवार निश्चित करून त्यांना मतदारांर्पयत पोहोचण्यासाठी वेळ देण्याची रणनीती मनसेकडून आखण्यात आली आहे. त्याअनुषंगाने येत्या 2क् सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू होत असल्याने त्यापूर्वीचे मनसेकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. (प्रतिनिधी)
 
17 किंवा 18 सप्टेंबर 
4येत्या 17 किंवा 18 सप्टेंबर रोजी पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे सूत्रंनी स्पष्ट केले. तसेच, या यादीत पुण्यातील काही विधानसभांचे उमेदवारही जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

 

Web Title: The first list of MNS in the next four days