शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोष्ट महाराष्ट्रातील पहिल्या 'गे कपल'च्या 'लग्नाची'; भारतात परवानगी नसल्याने अमेरिकेत केले लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 06:38 IST

समिर आणि अमितला काही झालं तरी त्यांना त्यांचं नात समाजापासून लपवून ठेवायचं नव्हतं. यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल असा विचार त्यांनी केला होता.

- युगंधर ताजणे 

पुणे :  समिर आणि अमितला काही झालं तरी त्यांना त्यांचं नात समाजापासून लपवून ठेवायचं नव्हतं. यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल असा विचार त्यांनी केला होता. म्हणून तर भारतात समलैंगिकांच्या लग्नाला परवानगी नसताना त्यांनी अमेरिकेत जावून लग्न केले. मागील वर्षी हे जोडपं भारतात परतले. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकांना देखील मुलभूत अधिकार. असा निर्णय दिल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर समिर आणि अमितच्या  ’’लग्नाची’’ गोष्ट पुढे आलीआहे.  लग्न करणारे ते महाराष्ट्रातले पहिले  ‘‘गे कपल’’ आहे.  ते दोघेही इंजिनिअर असून  एमबीएची देखील पदवी आहे. ते मागील पंधरा वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत.  दोघांना परदेशात राहून आपल्या प्रेमाला लग्न करुन कायदेशीररीत्या त्या नात्याला नाव द्यावेसे वाटले. समीर समुद्र आणि अमित गोखले यांचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्यासाठी त्यांना सतत आजुबाजुच्या लोकांकडून, नात्यातील काही व्यक्तींकडून, भलते सलते ऐकावे लागले. अनेक मित्रांकडून देखील त्यांच्या दुहेरीपणाने वागण्याचा अनुभव त्यांच्या वाट्याला आला. मात्र त्यांनी तो सहन केला.   ‘‘आम्ही जसे आहोत तसे आहोत. आमची काळजी समाजाने करण्याची गरज नाही. आम्हाला एकमेकांबद्द्ल जे काही वाटते ते सर्वकाही आमच्या दोघांचेच आहे.’’ समिर आणि अमितचे त्यांच्या नात्याबद्द्ल इतकी स्पष्ट् मते असताना देखील संकु चित मनाच्या व्यक्तींनी त्यांना कायमच दुषणे देवून त्यांचा मानसिक छळ करण्यात धन्यता मानली.  समीरला त्याच्या आणि अमितच्या नात्याविषयी विचारले असता त्याने सांगितले, आमचे एकमेकांवर प्रेम होते. मी पहिल्यांदा माझ्या घरच्यांना आमच्या संबंधाबद्द्ल सांगितले. घरच्यांना समलैंगिकता म्हणजे काय याविषयी काहीच माहिती नव्हते. त्यांच्याकडून खुप विरोध झाला. मात्र आम्ही दोघेही आमच्या नात्याविषयी ठाम होतो.  ज्याठिकाणी अमित आणि समिर काम करतात त्याठिकाणी देखील त्यांच्या नात्याला मोकळेपणाने स्वीकारले गेले. सहका-यांना आमच्या नात्याविषयी माहिती असल्याने त्यांनी कालांतराने आम्हाला त्रास देणे कमी केले. त्यांच्या वागण्या-बोलण्यात प्रेम व आपुलकी दिसून आली, अशी भावना समीर व्यक्त करतो. आम्हाला आमच्या नात्याविषयी अभिमान असून त्याविषयी ना खंत ना कुठली अडचण या शब्दांत अमित आपला रोखठोकपणा मांडतो. 

डोळ्यात आनंदाश्रू-जी गोष्ट कधीच होवू शकणार नाही अशी भावना कायम मनात ठेवून चाललो होतो शेवटी ती प्रत्यक्षात आल्यानंतर खुप आनंद झाला. मी आणि अमित आम्ही दोघेही कमालीचे भावनाप्रधान झालो होतो. -सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर तो ऐकल्यावर सुरुवातीचे दहा ते पंधरा मिनिटं आम्ही दोघेही रडत होतो. आमच्या डोळ्यात आनंदाश्रु होते.-आता या निर्णयाचे मोठे सेलिब्रेशन करणार असून मित्रांना जंगी मेजवानी देणार असल्याचा बेत समीरने बोलून दाखवला. 

टॅग्स :PuneपुणेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय