एकलहरेत २६२ जणांना पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:16 IST2021-05-05T04:16:37+5:302021-05-05T04:16:37+5:30

लसीकरण शिबिराचे उद‌्घाटन माजी सरपंच संतोष डोके यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच राणी खैरे, उपसरपंच दीपक डोके, ग्रामपंचायत ...

The first dose for 262 people in a single dose | एकलहरेत २६२ जणांना पहिला डोस

एकलहरेत २६२ जणांना पहिला डोस

लसीकरण शिबिराचे उद‌्घाटन माजी सरपंच संतोष डोके यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच राणी खैरे, उपसरपंच दीपक डोके, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप शिंदे, सुशील देठे, मनोज डोके, प्रवीण शिंदे, रीना डोके, विमल शिंदे, सुमन फलके, निखिल गाडे, नवनाथ शिंदे, स्वप्नील डोके, सुनील वाघ, निलेश डोके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी २६२ नागरिकांनी प्रथम मात्रा घेतली. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रसिका गवई, आरोग्यसेविका रेश्मा हगवणे व नीलम भालेराव, धर्मराज कोळी, शरद मेंगडे यांनी प्रत्यक्ष लसीकरण व्यवस्था सांभाळली.

संतोष कानडे, अभिजित नाटे, ज्ञानेश्वर मेमाणे यांनी लसीकरणपूर्व नोंदणी व्यवस्था पाहिली.

अधिकृत रजिस्ट्रेशन समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विद्या गवई, आरोग्यसेवक विश्वनाथ कारोटे, सोपान घोगरे, आशासेविका उषा भालेराव यांनी केले. समुपदेशन आशासेविका सविता देठे, अंजना रोकडे, वर्षा निघोट, सिंधू चासकर यांनी केले. लसीकरण शिबिरास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, केंद्रप्रमुख गजानन पुरी, साहेबराव शिंदे यांनी भेट दिली. लसीकरण शिबिराचे नियोजन यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका मनीषा कानडे, प्रदीप चासकर, राहुल डोके, सुलोचना देठे, जयश्री आग्रे, मनीषा बाणखेले, पूनम लोंढे, मनीषा घारे यांनी विशेष प्रयत्न केले.

--

Web Title: The first dose for 262 people in a single dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.