शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊननंतर कोर्टाचा पहिला दिवस, मात्र गर्दीला आवरताना झाली दमछाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 18:44 IST

गर्दी वाढल्यास आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास पुन्हा न्यायालय बंद करण्याची वेळ येऊ शकते..

ठळक मुद्देसध्या दोन शिफ्ट मध्ये न्यायालयाचे कामकाज करण्यात आले आहे सुरु पक्षकारांनी गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन, वकील संघटना यांना काळजी घ्यावी लागणार

पुणे : एरवी केवळ सुट्टीच्या दिवशी बंद असणारे न्यायालय तब्बल अडीच महिन्यानंतर सुरु झाले. यावेळी न्यायालयात पक्षकारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. ही गर्दी हटवण्यासाठी वकिलांना पुढाकार घ्यावा लागला. त्यांनी केलेल्या आवाहनला प्रतिसाद देऊन न्यायालयाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज पार पडले. बार असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांना पक्षकारांना समजुन सांगताना नाकीनऊ आल्याचे दिसून आले. सध्या दोन शिफ्ट मध्ये न्यायालयाचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. यापुढील दिवसांत पक्षकारांनी गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन, वकील संघटना यांना काळजी घ्यावी लागणार आहे.       सातत्याने नागरिकांना आवाहन करुन देखील ते ऐकत नाही म्हटल्यावर अखेर 'काम असल्याशिवाय न्यायालयात प्रवेश दिला जाणार नाही त्यामुळे गर्दी करू नका असे' पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर काही प्रमाणात गर्दी कमी झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे २३ मार्च पासून न्यायालयाचे कामकाज बंद होते. लॉकडाउनच्या काळात न्यायालयात सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत फक्त महत्वाच्या प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने ८ जून पासून योग्य त्या उपाययोजना करून सकाळी १० ते १ आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० अश्या दोन शिफ्टमध्ये राज्यातील न्यायालयाचे कामकाज सुरू करण्या बाबत निर्देश दिले.       यामध्ये प्रामुख्याने न्यायालयात प्रवेश करण्यासाठी फक्त एकच प्रवेशद्वार असावे, कामकाज असल्याशिवाय वकील, पक्षकारांना न्यायालयात प्रवेश देऊ नये, न्यायालयात प्रवेश देताना प्रवेशद्वारावर हॅण्ड सॅनिटाइज करण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, प्रवेश देताना प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग करावे, काम झाले की तात्काळ न्यायालयाच्या बाहेर निघून यावे आदी सूचना करण्यात आल्या होत्या. यावेळी पक्षकाराना न्यायालयात प्रवेश देण्यात येणार नसल्याने गर्दी न करण्याचे आवाहन वेळोवेळी प्रशासनामार्फत करण्यात आले होते. असे असताना असे असताना देखील वकील आणि पक्षकारांनी न्यायालयात गर्दी केली होती. मात्र बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि  पोलीस कर्मचारी यांनी आव्हान केल्यावर काही काळानंतर गर्दी आटोक्यात आली.

............................वकील आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन.. लॉकडाउन नंतर कामकाजाचा पहिला दिवस असल्याने न्यायालयात सोमवारी गर्दी झाल्याचे दिसून आले. मात्र न्यायालयामार्फत उद्या आणि परवाच्या कामाची माहिती फलकाव्दारे प्रसिध्द करण्यात येणार आहे. ती माहिती वकिलांच्या व्हाटस अ‍ॅपवर पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे ज्याच्या खटल्याची तारीख आहे त्यानेच न्यायालयात यावे. विनाकारण गर्दी करू नये. कोरोनाचे सावट अजून दूर झालेले नाही. त्यामुळे वकील, पक्षकारांनी विनाकारण न्यायालयात गर्दी करू नये.  गर्दी वाढल्यास आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास पुन्हा न्यायालय बंद करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे वकील आणि पक्षकारांनी प्रशासनला सहकार्य करावे. अ‍ॅड. सतीश मुळीक (अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन)

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसadvocateवकिल