राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत प्रथमेश फुगेला कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:11 IST2021-03-23T04:11:43+5:302021-03-23T04:11:43+5:30

स्पर्धेत २१ राज्यांतील खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्र संघाने सांघिक कांस्यपदक जिंकले. प्रथमेश हा पूना कॉलेजचा विद्यार्थी आहे. ...

First bronze medal in National Archery Championship | राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत प्रथमेश फुगेला कांस्य

राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत प्रथमेश फुगेला कांस्य

स्पर्धेत २१ राज्यांतील खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्र संघाने सांघिक कांस्यपदक जिंकले. प्रथमेश हा पूना कॉलेजचा विद्यार्थी आहे. स्पर्धेतील कामगिरीसाठी पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ. अफताब अन्वर शेख, उपप्राचार्य इक्बाल शेख, शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. अयाज शेख व क्रीडा शिक्षक असद शेख यांनी प्रथमेश फुगे याचा सत्कार केला. प्रथमेशला राष्ट्रीय प्रशिक्षक प्रवीण सावंत व क्रीडा शिक्षक इम्रान पठाण यांचे मार्गदर्शन मिळाले.

राष्ट्रीय शिबिरासाठी निवड

राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीमुळे हरयानात सोनीपत येथे होणाऱ्या राष्ट्रीय तिरंदाजी शिबिरासाठी प्रथमेश फुगे याची निवड करण्यात आली आहे. २२ मार्च ते दोन एप्रिलपर्यंत हे शिबिर होणार असून त्यात ४८ खेळाडू सहभागी होणार आहेत.

फोटो - प्रथमेश फुगे

----------------------------------------------

Web Title: First bronze medal in National Archery Championship