शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

आधी "तुमच्यामुळेच" चा ठपका आणि आता खाण्यापिण्याचे हाल ; पुण्याच्या पूर्वभागातील नागरिकांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 22:54 IST

पोलिसांनी हाणूनमारून केले बेजार

ठळक मुद्देया नागरिकांचे आता महिनाभरानंतर प्रचंड हाल

पुणे: पुण्यात तुमच्यामुळेचा वाढला कोरोना असे आता पूर्वभागातील नागरिकांना सर्वांकडून ऐकून घ्यावे लागत आहे. संपूर्ण परिसर रेडझोन मध्ये टाकल्याने पोलिसांनी आता या भागात दंडुकेशाही सुरू केली आहे. कष्ट करीत रोजचा दिवस कसाबसा काढणाऱ्या या नागरिकांचे आता महिनाभरानंतर मात्र खरोखरच खायचे हाल व्हायला लागले आहेत.

या भागातले बहुतेक लोक गरीब, कष्टकरी वर्गातले आहेत. काही चांगले नोकरदार, जरा बर्या आर्थिक स्थितीतलेही आहेत. त्या सर्वांनाच आता टाळेबंदी, त्यांनतर रेडझोन झाला म्हणूनची आणखी कडक टाळेबंदी, मग दोन दिवस सगळेच एकदम कडक बंद याचा त्रास होतो आहे. वर इतर ठिकाणचे नातेवाईक, ओळखी पाळखीचे यांच्याकडून तुमच्यामुळेच वाढला कोरोना हे चेष्टेत, चिडवायचे, ऊचकावयचे म्हणून का होईना पण ऐकून घ्यावे लागत आहे.

पूर्व भागातले बहुसंख्य गल्लीबोळ बांबू लावून बंद करण्यात आले आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांना मदतीला घेत पोलीस ही तटबंदी करतात आणि नंतर तेच कार्यकर्ते पोलीस असल्याच्या थाटात अरेरावीने वागतात. मासेआळी, मोमीनपूरा, घोरपडी पेठ, टिंबर मार्केट, अशा बहुतेक ठिकाणी गुरूवारी दुपारी व आज शुक्रवारीही हिच स्थिती होती. कोरोना रूग्ण सातत्याने आढळत आहेत त्या भवानीपेठेत तर यापेक्षा अधिक दांडगाईचे वातावरण आहे.त्यातच आता कष्टकरी वर्गापैकी अनेकांची शिल्लक संपली आहे. घरातून बायको, मोठ्या मुलांकडून पैसे घेऊन तेही संपले आहेत. फुकट मिळणार असलेल्या धान्यावर किंवा मग कोणी काही काम सांगितले तर चोरूनलपून ते करून पैसे मिळतील यावर त्यांची सगळी मदार आहे. दूध, सकाळचा चहा खारी बटर आता विस्मरणात चालला आहे. दुपारची, रात्रीची आणि मग उद्याचीही भूक कशी भागवायची याची चिंता त्यांना भेडसावते आहे. त्याशिवाय कोरोना चा संभाव्य संसर्गही त्यांच्या छातीवर आहेच.

 एक प्रसंग... 

वेळ गुरुवारी दुपारची... गंजपेठ पोलिस चौकीच्या समोर खुर्च्या टाकून बसलेल्या एका पोलिसाला त्याच्या वॉकीटॉकीवर साहेबांचा राऊंड येत असल्याचा संदेश आला. त़ो त्याने इतरांंना सांगितले. दोघे तिघे लगेच उठले आणि तोपर्यंत समोरच्या फुटपाथवर अगदी कडेला उभ्या असलेल्या गरीब बाप्यावर डाफरले. समोरच्या देवेंद्र मेडिकलमध्ये औषधे घेण्यासाठी म्हणून येत असलेल्या एका मुस्लिम महिलेला, ए चलो, घर जाव, बाद मे आव असे सांगितले गेले. चौकीपासून दूर एका कोपऱ्यात हातगाडीवर दोन म्हातारे सावलीला बसले होते, त्यांच्या अंगावर एकाने काठी ऊगारली व त्यांना हुसकावले.कितीतरी वेळाने साहेबाचा ताफा गाडीतून आला. निर्मनुष्य रस्ता पाहून गाडीतूनच असेच ठेवा रे दिवसभर असा आदेश देत निघून गेला. असाच प्रकार मग खडक पोलिस ठाण्यासमोरही झाला. 

...........................नगरसेवक व राजकीय कार्यकर्ते म्हणजे या भागातील नागरिकांचे तारणहार. पण सुरूवातीच्या औषध फवारणीवर वारेमाप टीका झाल्यावर तेही सगळे गायब झाले आहेत. काँग्रेसचे या भागातील नगरसेवक अजित दरेकर म्हणाले, प्रशासनाने आम्हाला खड्यासारखे बाजूला ठेवले आहे. पण त्यात त्यांची चूक आहे असे वाटत नाही. हा कोरोना चा आजार गर्दी करण्यामुळे फैलावणारा आजार आहे. नागरिकांनी संयम ठेवावा, व प्रशासनाने त्या़चे पोटाचे हाल होणार नाहीत याची काळजी घ्यावी. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस