शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अाधी संवाद मग कारवाई ; वाहतूक पाेलिसांचे धाेरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 18:54 IST

अाजपासून जे सरकारी कर्मचारी हेल्मेट घालणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार हाेती. परंतु सध्या वाहतूक पाेलीस कारवाई न करता सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याबाबत अावाहन करत अाहेत.

पुणे : नववर्षापासून पुण्यात पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती केली जाणार अाहे. त्याला अनेक स्तरातून विराेध हाेत असताना हेल्मेट सक्तीवर पुण्याचे पाेलीस अायुक्त ठाम अाहेत. त्यातच अाजपासून जे सरकारी कर्मचारी हेल्मेट घालणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार हाेती. परंतु सध्या वाहतूक पाेलीस कारवाई न करता सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याबाबत अावाहन करत अाहेत. सर्व सरकारी कार्यालयांशी संपर्क व जनजागृती केल्यानंतर हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिली. 

    पुण्यात एक जानेवारीपासून हेल्मेट सक्ती केली जाणार अाहे. या अाधी पाचवेळा पुण्यात हेल्मेट सक्ती करण्यात अाली हाेती. प्रत्येकवेळी पुणेकरांनी याला कडाडून विराेध केला अाहे. अाता पुण्याचे नवे पाेलीस अायुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांनी येत्या एक जानेवारीपासून दुचाकीवर हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले अाहे. याला दुचाकी चालकांच्या अपघाताचे कारण पुढे केले अाहे. हेल्मेट न घालणाऱ्या नागरिकांवर एक जानेवारीपासून कारवाई केली जाणार असली तरी सरकारी कर्मचाऱ्यांवर अाजपासूनच कारवाई करण्यात येणार हाेती. परंतु सध्या सरकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचे काम वाहतूक शाखेकडून करण्यात येत अाहे. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती केल्यानंतर कारवाई करण्यात येणार अाहे. 

    दरम्यान अाज हेल्मेट विराेधी कृती समितीची बैठक घेण्यात अाली असून या सक्तीला कुठल्या पद्धतीने विराेध करायचा याबाबत चर्चा करण्यात अाली. या बैठकीला या कृती समितीचे समन्वयक अंकुश काकडे, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर अादी उपस्थित हाेते. 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस