आधी आश्वासन पाळा, मग कचराप्रश्नी चर्चा
By Admin | Updated: February 23, 2015 00:49 IST2015-02-23T00:49:12+5:302015-02-23T00:49:12+5:30
महापालिकेला अनेकदा मुदतवाढ देऊनही आश्वासने पाळली जात नाहीत. येत्या दोन दिवसांत पालकमंत्री बापट यांच्याशी चर्चा करून ठोस निर्णय घ्यावा

आधी आश्वासन पाळा, मग कचराप्रश्नी चर्चा
पुणे : महापालिकेला अनेकदा मुदतवाढ देऊनही आश्वासने पाळली जात नाहीत. येत्या दोन दिवसांत पालकमंत्री बापट यांच्याशी चर्चा करून ठोस निर्णय घ्यावा; अन्यथा कचरा बंद आंदोलन कायम ठेवण्यात येईल, असा इशारा उरुळी देवाची व फुरसुंगीच्या ग्रामस्थांनी आज दिला.
शहरात रोज सुमारे १६०० टन कचरा निर्माण होतो. ८० टक्के कचरा उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोवर पाठविण्यात येतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध केल्यामुळे शहरात कचराकोंडी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश बापट यांनी ग्रामस्थ आणि पालिकेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. मात्र, त्यावर तोडगा काढण्यात आला नाही.
कचरा प्रश्नाचा हा तिढा सोडविण्यासाठी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी स्थानिक ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.