शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

प्रथम परदेशात जाताना आमचीही उडाली होती धांदल; ‘शोध मराठी मनाचा’मध्ये उमटला सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 2:47 PM

भारतभूमी आणि भारतातील लोकांवर आमचे प्रेम आहेच, पण एकूणच प्रगतीचा विचार करता भारतीय व्यवस्थेतील बाबुगिरीवर योग्य ते चाप बसविण्याची गरज उपस्थित मान्यवरांनी एकमताने व्यक्त केली.

ठळक मुद्देप्रयत्नांच्या पराकाष्ठेला पर्याय नाही : परिसंवादातील सूरउपस्थित सर्वांनाच समृद्ध करून गेले परदेशात स्थायिक मराठी बांधवांचे विविधांगी अनुभव

पुणे : आम्हा प्रत्येकाची सुरुवात ही शून्यातूनच झाली असून, पहिल्यांदा परदेशात जाताना आमचीदेखील धांदल उडाली होती, त्यामुळे कोणताही न्यूनगंड न बाळगता आपले ध्येय निश्चित करून युवकांनी वाटचाल केली पाहिजे. भारतभूमी आणि भारतातील लोकांवर आमचे प्रेम आहेच, पण एकूणच प्रगतीचा विचार करता भारतीय व्यवस्थेतील बाबुगिरीवर योग्य ते चाप बसविण्याची गरजही उपस्थित मान्यवरांनी एकमताने व्यक्त केली.निमित्त होते, जागतिक मराठी अकादमीतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात आयोेजित 'शोध मराठी मनाचा' या १५व्या जागतिक संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातील परिसंवादाचे. समद्रापलिकडे (भाग १) या परिसंवादात किशोर गोरे (अमेरिका) संगीता तोडमल (अमेरिका), अविनाश पाध्ये (अमेरिका), रवींद्र काळे (दुबई), नॅप अल्मेडा (आॅस्ट्रोलिया), शीला परेरा (आस्ट्रेलिया), गजानन सबनीस (अमेरिका), सुनिल देशमुख (फ्लोरिडा)  आणि सुरेश तलाठी यांनी भाग घेऊन आपले अनुभव कथन केले. केतन गाडगीळ आणि स्नेहल दामले यांनी त्यांच्याशी संवाद साधला. कोणाचे परदेशात जाऊन स्थायिक होणे खूप नियोजनपूर्वक, तर कोणाचे परदेशात जाणे अगदी अपघातानेच, परदेशात सुरुवातीच्या काळात कोणाला अतिशय सुखद अनुभवांची शिदोरी, तर कोणापुढे संघर्षाचे डोंगर उभे ठाकलेले आहेत. पण या सगळ्यांतून परदेशात स्थायिक होऊ पाहणाऱ्या मराठी बांधवांना त्या त्या देशातल्या मराठी मंडळांनी केलेली मदत निश्चितच मोलाची आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून परदेशात स्थायिक झालेल्यांचे मराठी बांधवांचे विविधांगी अनुभव उपस्थित सर्वांनाच समृद्ध करून गेले.परदेशात स्थायिक होऊन आपला उद्योग किंवा व्यवसाय उभा करायचा, तर प्रयत्नांच्या पराकाष्ठेला पर्याय नाही, असे सांगून या मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अनेक देशांमध्ये एकच धर्म किंवा एकाच विचारधारेच्या लोकांची संख्या खूप जास्त आढळून येते. भारतात मात्र याबाबतीत असलेली विविधता लक्षात घेऊन सर्वंकष प्रगतीसाठी सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत, असा सूर या परिसंवादात निघाला. 

टॅग्स :Puneपुणे