शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यास लाच देणा-या दोघांना पकडले, पुण्यात अशाप्रकारची पहिलीच कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 19:41 IST

आपल्यालाच लाच देत असल्याच्या तलाठ्याच्या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेतजमीन मालक व वाळूवाहतूकदार यांना ६० हजार रुपयांची लाच देताना पकडण्यात आले. पुण्यात अशाप्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.

पुणे : सातबाराच्या नोंदी करण्यापासून विविध कामांसाठी लाच मागितल्याबद्दल नागरिकांच्या तक्रारीवरुन लाच घेताना तलाठ्याला पकडल्याच्या बातम्या येत असतात. पण, आपल्यालाच लाच देत असल्याच्या तलाठ्याच्या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेतजमीन मालक व वाळूवाहतूकदार यांना ६० हजार रुपयांची लाच देताना पकडण्यात आले. पुण्यात अशाप्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हवेली तालुक्यातील बुर्केगाव येथील तलाठी कार्यालयात मंगळवारी दुपारी ही कारवाई केली़. शेतजमीन मालक धोंडिबा मारुती वाघमोडे (वय २६, रा. बुर्केगाव) आणि वाळू वाहतूकदार तुकाराम किसन पवळे (वय ५२) असे त्यांची नावे आहेत.याबाबतची माहिती अशी, धोंडिबा वाघमोडे यांनी स्वत:च्या शेतीमधून बेकायदा वाळूचे उत्खनन केल्याचे येथील तलाठी यांच्या निदर्शनास आले होते. या बेकायदा वाळू उत्खननाबाबतचा अहवाल त्यांनी हवेलीच्या तहसीलदार यांना सादर केला होता़ या अहवालावरुन त्यांनी कारवाई करु नये, यासाठी त्यांना लाच देण्याचा प्रयत्न शेतमालक व वाळू वाहतूकदार यांच्याकडून होत होता.बुर्केगावचे तलाठी यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. लोकसेवकाला लाच देणे, हा गुन्हा दोत असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी पडताळणी केली. त्यात तलाठी यांना ६० हजार रुपये लाच देत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त जगदीश सावत यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तालुक्यातील बुर्केगाव येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला़ शेतमालक धोंडिबा वाघमोडे आणि वाळू वाहतूकदार तुकाराम पवळे हे दोघे जण दुपारी दीडच्या सुमारास तलाठी कार्यालयात आले. तलाठी यांना ६० हजार रुपयांची लाच देत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले़ त्याच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे.याशिवाय बुर्केगाव तलाठी यांनी बेकायदा वाळू उत्खननाचा अहवाल तहसीलदारांना सादर केला असून त्यावरुन शेतमालकाविरोधात दंडाची कारवाई होऊ शकते.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे