शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गोळीबार; तळेगावात सहा जणांवर गुन्हा दाखल

By प्रकाश गायकर | Updated: June 21, 2024 20:33 IST

गोळीबाराचा थरार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला

पिंपरी : तळेगाव दाभाडे शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सहा जणांच्या टोळक्याने गुरुवारी (दि. २०) सायंकाळच्या वेळी चार ठिकाणी गोळीबार केला. याप्रकरणी शुक्रवारी (दि. २१) सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन उर्फ चिक्या उत्तम शिंदे (रा. शिवाजी चौक, तळेगाव स्टेशन), विकी खराडे आणि अन्य चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार आनंद मोहिते यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चिक्या शिंदे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून तळेगाव दाभाडे शहरातील गजानन चौक, शाळा चौक, राजेंद्र चौक, मारुती मंदिर चौक या ठिकाणी गोळीबार केला. आरोपींनी शहरात दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने हा गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर सर्व आरोपी पसार झाले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलिस आयुक्त देविदास घेवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप रायण्णावार, पोलिस उपनिरीक्षक अशोक कोकाटे यांनी घटनास्थळी भेट दिली. गोळीबाराचा थरार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज जमा केले आहे. त्यानुसार आरोपींचा माग काढला जात आहे. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेTalegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी