शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

रस्त्याच्या जुन्या वादातून लोहगावात गोळीबार, दोन आरोपी ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 1:28 PM

रस्त्याच्या जुन्या वादातून ठार मारण्याचा प्रयत्न

पुणे : रस्त्याच्या जुन्या वादातून दोघा भावांनी गोळीबार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना खांदवेनगर लोहगाव येथे बुधवारी रात्री घडली. या घटनेत मधुकर दत्तात्रय खांदवे (वय ५४ ,रा.खांदवेनगर,लोहगाव) हे जखमी झाले असून गोळीबार करणाऱ्या अभिजित बाळासाहेब शेजवळ व सुरज बाळासाहेब शेजवळ या दोघांना गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खांदवेनगर लोहगाव येथे गोळीबार झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून विमानतळ पोलिसांना देण्यात आली होती. घटनास्थळी तात्काळ विमानतळ पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी रवाना झाले. याठिकाणी  राहणारे मधुकर खांदवे यांच्यावर अभिजित व सुरज शेजवळ या दोघा भावांनी साथीदारांच्या मदतीने गोळीबार केल्याचे समजले. खांदवे यांच्यावर आरोपींनी दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी त्यांच्या डोक्याला चाटून गेली. त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  वहिवटिच्या रस्त्याच्या वादातून हा प्राणघातक हल्ला केल्याची माहिती फिर्यादी मधुकर खांदवे यांनी फियार्दीत दिली. घटनास्थळी पोलिसांना एक जिवंत काडतुस, एक पुंगळी,फायर झालेला बुलेटचा तुकडा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी अभिजित व सूरज शेजवळ यांना विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. घटनास्थळी अपर पोलिस आयुक्त सुनील फुलाची, पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त रामचंद्र देसाई यांच्या सह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक जे. सी. मुजावर करत आहेत.

टॅग्स :LohgaonलोहगावFiringगोळीबारPoliceपोलिस