पूर्ववैैमनस्यातून कॅम्पात गोळीबार

By Admin | Updated: July 21, 2014 03:49 IST2014-07-21T03:49:21+5:302014-07-21T03:49:21+5:30

लष्कर भागातील गुडलक हॉटेलजवळील मुक्ती फौज चौकात चौघांनी केलेल्या गोळीबारात दोघे जण जखमी झाले़ ही घटना रात्री साडेनऊ वाजता घडली़

Firing from premeditance camp | पूर्ववैैमनस्यातून कॅम्पात गोळीबार

पूर्ववैैमनस्यातून कॅम्पात गोळीबार

पुणे : लष्कर भागातील गुडलक हॉटेलजवळील मुक्ती फौज चौकात चौघांनी केलेल्या गोळीबारात दोघे जण जखमी झाले़ ही घटना रात्री साडेनऊ वाजता घडली़
मोहन गवळी (रा़ गवळी गोठ्याजवळ, नवा मोदीखाना) आणि बबलू गवळी (रा़ नवा मोदीखाना) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत़ या दोघांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत़
मोहन गवळी व बबलू गवळी हे मुक्ती फौज चौकात असताना दारू पिऊन गाडी चालवत चौघे जण तेथे आले होते़ गाडी पार्क करण्यावरून त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्यांच्यातील एकाने आपल्याकडील रिव्हॉल्व्हर काढून त्यातून गोळीबार केला़ इतरांनी आपल्याकडील शस्त्राने दोघांवर वार करुन त्यांना जबर जखमी केले़ त्या ठिकाणी असलेल्या एका टेम्पोच्या काचा फोडण्यात आला़ या घटनेनंतर पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त आत्मचरण शिंदे, पोलीस निरीक्षक बी़ बी़ मुजावर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले़ या परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे़
याबाबत लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी़ बी़ मुजावर यांनी सांगितले, की चौघा हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून त्यांनी १ राऊंड फायर केल्याची माहिती मिळाली असून इतरांनी आपल्याकडील शस्त्राने दोघांवर वार केले आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Firing from premeditance camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.