शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर शहरात गोळीबार ; एक जण गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 17:57 IST

तुम्हांला लय माज आला आहे काय.. असे म्हणुन त्याच्या हातातील पिस्तूलाने फिर्यादी यांचे दिशेने फायरिंग करण्यास सुरुवात केली.

ठळक मुद्देरात्री सव्वा बारा वाजता झाली घटनासहा ते सात गोळ्या फायरिंग केल्याचा अंदाज : तीन गाड्यांचे नुकसान 

इंदापूर : जुन्या भांडणाचा वादावरून इंदापूर शहरातील श्रीराम सोसायटी येथे सात जण व अनोळखी चार जणांनी गोळीबार करून एकास गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री १२. ३० वाजता घडली असून यामध्ये लक्ष्मण सुभाष धनवे, रा. श्रीराम सोसायटी, इंदापूर, ता इंदापूर हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत रोहित मनोज इंगळे ( वय २० ) रा. श्रीराम हौशिंग सोसायटी, इंदापूर ) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये आरोपी अतुल शेटे पाटील, सोमनाथ खरवडे, बंटी पाचनकर, भैय्या चित्राव, सुमित साळुंखे, विठ्ठल महाडिक, शंभू पवार व तसेच इतर ४ जण, (सर्व रा. मेन पेठ, इंदापूर, ता इंदापूर जि. पुणे ) असे आरोपींची नावे असून, यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 इंदापूर शहरातील श्रीराम सोसायटीत खिलारे यांच्या दुकानासमोर रोहित इंगळे व त्याचा मित्र लक्ष्मण सुभाष धनवे, संतोष भगवान साळुंखे असे गप्पा मारत बसले असताना, यातील आरोपी यांनी त्यांची डस्टर कार क्रमांक (एमएच  १७७०) तसेच ३ मोटरसायकलवरून येवून फिर्यादी व त्यांचे मित्रांना त्यांच्याशी पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपी नंबर एक अतुल शेटे पाटील म्हणाला की, तुम्हांला लय माज आला आहे काय.. असे म्हणुन त्याच्या हातातील पिस्तूलाने फिर्यादी यांचे दिशेने फायरिंग करण्यास सुरुवात केली.  त्यावेळी फिर्यादी व त्यांचे मित्र घाबरून इकडे तिकडे पळत असताना लक्ष्मण धनवे यांच्या उजवे पायाच्या पिंडरीवर गोळी लागून, तो जखमी होवून जमिनीवर पडला. त्यावेळी त्याच्या पायाला गोळी लागून जखम झाली.  त्यांनतर उर्वरीत सहा आरोपी व अनोळखी चार जनांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडके व लोखंडी रॉड घेवून फिर्यादी व त्यांचे मित्रांना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग केला,  त्यावेळी फिर्यादी व त्यांचे मित्र अंधाराचा व गल्लीबोळाचा फायदा घेवुन तेथुन पळून गेले व पुढील गल्लीच्या एका बोळात जावून लपले.  त्यावेळी आरोपींची फिर्यादीच्या मोटारसायकलची तोडफोड करून नुकसान केले व शिवीगाळ दमदाटी करून निघून गेले अशा आशयाची फिर्याद इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे करीत आहेत. तर बारामती विभागाचे पोलीस अधीक्षक नारायण शिरगावकर यांनी भेट दिली आहे.यामधील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आरोपींनी सात गोळ्या फायरिंग केल्याचे घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी सांगितले. ______:________

चौकट : सर्व आरोपींना लवकरच ताब्यात घेणार 

सदर घटना घडल्यानंतर बारामती विभागीय पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली व लोकमतशी बोलताना सांगितले की,सदर घटनेतील आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत._______________

दोन मोटारसायकल व रुग्णवाहिकेचे नुकसान 

या घटनेमध्ये आरोपींकडून सोसायटीमधील  पल्सर एम. एच. ४२ ए.बी १८६६ चे गाडीची टाकी, बॅटरी फोडून नुकसान, एम एच १४ बी एस ८२६३ चे स्प्लेडस गाडीच्या टाकीचे नुकसान तसेच पै. स्व. पांडुरंग रामचंद्र खिलारे ( गुरुजी ) प्रतिष्ठान च्या रुग्णवाहिका (क्रमांक एमएच. ४२ ए.क्यू. ९००९ )चे पाठीमागून गोळी लागून पत्रा फाटला असून तीन गाड्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. ______________

 

टॅग्स :IndapurइंदापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFiringगोळीबार