स्वारगेट परिसरात गोळीबाराची घटना; दुचाकीस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2023 23:33 IST2023-07-19T23:31:55+5:302023-07-19T23:33:20+5:30
या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

स्वारगेट परिसरात गोळीबाराची घटना; दुचाकीस्वार जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे :स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडामंच जवळील डायमंड हॉटेलसमोरील रस्त्यावर बुधवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. रिक्षातून जात असलेल्या एका व्यक्तीने दुचाकीवरील एका तरुणावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी मिळाली आहे. ही घटना रात्री साडेनऊ ते पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला पोलिस येण्यापूर्वीच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना त्या ठिकाणी दोन पुंगळ्या मिळाल्या. तसेच रस्त्यावर काही अंतरावर रक्त सांडल्याच्या खुणा दिसून आल्या आहे. या गोळीबारामागील कारण अद्याप समजले नाही. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्हींची पाहणी करण्यात येत आहे.