शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

Video : सोन्याच्या दुकानात गोळीबार :कारण अज्ञात, पोलिसांचा तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 17:19 IST

कोंढवा येथील येवलेवाडीमध्ये भर बाजारपेठेत असलेल्या गणेश ज्वेलर्स या दुकानात कामगार चार जणांनी गोळीबार केला आहे.

पुणे : कोंढवा येथील येवलेवाडीमध्ये भर बाजारपेठेत असलेल्या गणेश ज्वेलर्स या दुकानात कामगार चार जणांनी गोळीबार केला आहे. यात दुकानातील कामगार अमृत मेघावल या गंभीर जखमी झाला आहे. त्याला हाताला गोळी लागली असून उपचारासाठी भारती विद्यापीठ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

            येवलेवाडीत मुख्य कमानीतून आत आल्यावर डाव्या हाताला असलेल्या या सोने-चांदीच्या दुकानात नेहमीप्रमाणे बसले होते. दुपारी चार व्यक्ती दुकानात आल्यावर त्यांनी अमृत बरोबर चर्चा केल्याचे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्या मधून दिसून येत आहे. त्यांनतर त्यातील एकाने अमृतवर गोळी झाडली.

           यानंतर हल्लेखोर दोन दुचाकीवरून कात्रजच्या दिशेने फरार झाले. या दुकानाचे मालक मालतसिंग ओदसिंग देवठी हे त्यांच्या गावी मागील आठ दिवसांपासून गेलेले आहेत. तेव्हापासून अमृत हा एकटाच दुकान सांभाळत आहे. विशेष म्हणजे दुकानातील कोणत्याही सोन्या-चांदीच्या वस्तूना हल्लेखोरांनी चोरल्या नाहीत किंवा तसा प्रयत्न केल्याचेही दिसून येत नाही. यांमुळे हा दरोड्यांचा  प्रयत्न होता की यामागे वेगळे कारण आहे, याचा अधिक तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.कोंढवा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील आणि इतर अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली तर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्‍त समीर शेख, दरोडा प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम आणि इतर अधिकारी येवलेवाडीच्या दिशेने रवाना झाले आहेत. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून उपलब्ध  सीसीटीव्ही फुटेज संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. हल्‍लेखोराने दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गोळीबार केला अथवा इतर कोणत्या अन्य कारणावरून गोळीबार झाला हे अद्याप स्पष्ट होवु शकलेले नाही.

पाहा व्हिडीओ

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारKondhvaकोंढवा