शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

फेरनिविदेस अजून दीड महिना, समान पाणी योजना, व्याजापोटी दरमहा १५ लाखांचा भुर्दंड सुरूच  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 3:11 AM

महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी २४ तास पाणी योजनेची फेरनिविदा तयार व्हायला अजूनही दीड महिना लागणार आहे. आधीच्या निविदेवर झालेले आरोप व त्यानंतर केंद्र सरकारच्या नव्या वस्तू व सेवा करांमुळे (जीएसटी) साहित्याच्या दरामध्ये पडलेला फरक, यातून ती निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यानच्या काळात पाणी योजनेच्या कामासाठी काढलेले कर्जरोखे, त्यासाठी द्यावे लागणारे व्याज अशी बरीच मोठी गुुंतागुंत या कामात निर्माण झाली आहे.

पुणे : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी २४ तास पाणी योजनेची फेरनिविदा तयार व्हायला अजूनही दीड महिना लागणार आहे. आधीच्या निविदेवर झालेले आरोप व त्यानंतर केंद्र सरकारच्या नव्या वस्तू व सेवा करांमुळे (जीएसटी) साहित्याच्या दरामध्ये पडलेला फरक, यातून ती निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यानच्या काळात पाणी योजनेच्या कामासाठी काढलेले कर्जरोखे, त्यासाठीद्यावे लागणारे व्याज अशी बरीच मोठी गुुंतागुंत या कामात निर्माण झाली आहे.समान पाणी योजना एकूण ३ हजार १०० कोटी रुपयांची आहे. त्यापैकी २ हजार १६४ कोटी रुपये कर्जरोख्यांमधून उभे करण्यात येत आहे. त्यातील २०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्यातही आले. त्यासाठी महापालिकेला दरमहा व्याज द्यावे लागत आहे. निविदाचरद्द करावी लागल्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू झालेच नाही व कर्जरोखे तर काढले, अशी महापालिकेची स्थिती झाली आहे. फेरनिविदा त्वरित काढण्यात येईल, असे प्रशासनाने जाहीर केले होते;मात्र आता पूर्वीची निविदा रद्द होऊन दोन महिने झाले, तरीही प्रशासनाकडून अद्याप यासंदर्भात काहीही हालचाल करण्यात आलेली नाही.सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले की, पदाधिकाºयांचे या योजनेकडे लक्ष आहे. निविदा प्रक्रिया व्यवस्थित, पारदर्शी होईल याबाबत अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. आधीची निविदा रद्द झाली असली, तरीही हे काम होणार आहे. फेरनिविदेला विलंब होत आहे; पण आधी झालेल्या चुका पुन्हा होऊ नयेत, याची काळजी घेण्यात येत आहे. इतक्या मोठ्या कामात ठेकेदार कंपन्यांमध्ये स्पर्धा व्हावी, असा पदाधिका-यांचा हेतू आहे. त्यामुळेच जॉइंट व्हेंचर करण्याचा विचार सुरू आहे. त्यावर अन्य पदाधिकाºयांच्या संमतीने लवकरच निर्णय होईल व फेरनिविदा जाहीर करण्यात येईल.जीएसटीमुळे बदललेल्या दराचा इस्टिमेट कमिटीकडून अभ्यास सुरू आहे, असे याबाबत सांगण्यात येत आहे; तसेच या योजनेतील पन्नासपेक्षा अधिक साहित्याचा दर १ लाख रुपयांपेक्षा कमी आहे. अशा गोष्टींची निविदा काढताना बांधकाम विभागाची मान्यता लागते. त्यांच्याकडे याची माहिती देण्यात आली आहे; मात्र ती मान्यता अद्याप मिळालेली नाही, दरनिश्चितीचे काम सुरू आहे, असेच सांगण्यात येते. महापालिका आयुक्तांनी मोठ्या प्रकल्पांच्या निविदा, तसेच अन्य कामांसाठी म्हणून एक स्वतंत्र कक्ष नियुक्त केला आहे, या कक्षाकडूनही याबाबत काहीही होताना दिसत नाही.निविदेसाठी चार कंपन्यांनी साखळी केल्याचा विरोधकांचा आरोपया कामाची कामांनुसार वेगवेगळी निविदा काढायची की एकत्रित, याचाही अंतिम विचार अद्याप झालेला नाही. आधीच्या निविदेत चार वेगवेगळे टप्पे करून, चार निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र साखळी करून फक्त चार कंपन्यांनी ही कामे मिळवली असल्याचा आरोप काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांकडून करण्यात आला होतांफेरनिविदा काढण्यास विलंब होत आहे ही वस्तुस्थिती आहे; पण त्यात सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाहण्यात येत आहेत. आता बहुतेक काम पूर्ण झालेले असून, इस्टिमेट कमिटीपुढे ते मांडण्यात येईल. त्यांच्या मंजुरीनंतर निविदा अंतिम होईल व प्रसिद्ध केली जाईल. आणखी दोन आठवड्यांत निविदा प्रसिद्ध होईल.- विजय कुलकर्णी, अधीक्षक अभियंता,पाणीपुरवठा विभागनिश्चित केलेल्या दरांपेक्षा ३६ टक्के इतक्या जास्त दराने निविदा दाखल करण्यात आल्या व त्या मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला गेला, अशीही टीका आकडेवारीसह राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. आधीची निविदा रद्द करण्यामागेही हेही एक कारण असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे