मरकळमध्ये चपलांच्या दुकानाला आग
By Admin | Updated: October 13, 2016 02:21 IST2016-10-13T02:21:22+5:302016-10-13T02:21:22+5:30
मरकळ येथील चपलांच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून ते खाक झाले. दुकानदाराचे सात ते आठ लाखांचे नुकसान

मरकळमध्ये चपलांच्या दुकानाला आग
आळंदी : मरकळ येथील चपलांच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून ते खाक झाले. दुकानदाराचे सात ते आठ लाखांचे नुकसान झाले आहे. मालक भानुदास कोंडिबा चव्हाण (रा. मरकळ) असे दुकानदाराचे नाव आहे. काही तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यास अग्निशामक दलाला यश आल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, आगीत चपलांच्या दुकानाचे पूर्ण नुकसान झाले. आळंदी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चासकर पुढील तपास करीत आहेत.